🌟परभणीत विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचे जोरदार स्वागत....!


🌟शहरात आगमन होताच नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांनी प्रथमतः महापुरुषांना अभिवादन केले🌟 

परभणी (दि.२२ जुलै २०२४) : महाराष्ट्र विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचे आज सोमवार दि.२२ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता परभणी शहरात आगमन झाले यावेळी राष्ट्रवादीच्या आजीमाजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले परभणी शहरात आगमन झाल्यानंतर आमदार राजेश विटेकर यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तसेच परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. 

यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण तळेकर, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कृष्णा कटारे, अक्षय जगताप, संजय कदम, रामेश्‍वर आवरगंड, मुरली केसरे आदीनी आ. विटेकर यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर त्यांची मिरवणूक वसमत रोड मार्गे काढण्यात आली. या मार्गावरील कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे श्री शिवाजी कॉलेज समोरील राष्ट्रवादीच्या शाखा फलकाचे अनावरण आ. विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर खानापूर फाटा येथे आ. विटेकर यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. दर्गा रोडवरही त्यांचे स्वागत झाले. यावेळी ठिकठिकाणी व्यापारी, नागरीकांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूकीत राष्ट्रवादीचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या