🌟तांत्रिक कामगार युनियनची मागणी🌟
नागपूर :- महावितरण जाहीरात क.05/2023, जाहीरात क. 06/2023,जाहीरात क. 07/2023,जाहीरात क. 08/2023 प्रमाणे सरळ सेवा भरती अंतर्गत पदे भरण्यासाठी कंपनीने जाहीरात प्रसिध्द करण्यात आली असून या सरळ सेवा भरतीमध्ये एस इ बी सी उमेदवारांना विकल्प सादर करणे करिता एक महिन्याचा कालावधी वाढून देण्यात यावा अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री व महावितरण व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे तांत्रिक कामगार युनियन 5059 ने केली असल्याची माहिती केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे
राज्य शासनाने राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरीता (SEBC) आरक्षण अधिनियम 2024 दि. 26 फेब्रवारी, 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतुद विहित करण्यात आली असून कंपनीने प्रसिध्दीपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये (SEBC) उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील (SEBC) प्रवर्गाचा विकल्प सादर करणे करीता दि. 17/07/2024 पर्यंत अवधी दिला आहे. या कालावधीमध्ये अनेक उमेदवारांना विकल्प सादर करता आलेला नाही. विकल्प सादर करणे करीता अनेक अडचणी निर्माण होत असल्याने सदरहु कालावधी दि. 17/08/2024 पर्यंत कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर. पवार, सतिश भुजबळ, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवणेचारी, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे, आर. आर.ठाकुर, राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी पारेषण विक्रम चव्हाण, दत्तु भोईर, किरण कऱ्हाळे, प्रकाश वाघ, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, प्रसिध्दी प्रमुख अनिल सरोदे, विक्की कावळे यांनी केलीआहे.....
0 टिप्पण्या