🌟परभणी तालुक्यातील पिंगळी येथील गोकुळनाथ विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी बससेवा सुरू....!


🌟संस्थेचे अध्यक्ष आंबादासराव गरुड यांच्या प्रयत्नांना यश : विद्यार्थींनीसह पालकवर्गाने केले आभार व्यक्त🌟  


     
परभणी :- परभणी तालुक्यातील पिंगळी येथील गोकुळनाथ विद्यालयात शिक्षणासाठी येथे येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना बस नसल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता विद्यार्थींनींची अडचन लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष आंबादासराव गरुड,प्राचार्य सौ गरुड एसए.मॅडम, प्रा. हरिपाल काळे व प्रा.अनंता भालेराव यांच्या प्रयत्नामुळे मानव विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत बसची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेत शिक्षण घेणाऱ्या आसपासच्या गावातील विद्यार्थींनींसह माखणी गावातील गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.

तसेच माखणी गावकऱ्यांच्या वतीने बसची पूजा करून वाहन चालक बापूराव सुरनर व वाहक प्रकाश मोरे या दोघांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थ हरिभाऊ आवरगंड, नामदेव आवरगंड, पत्रकार जनार्धन आवरगंड, रामदास नवघरे, राजेश भुजबळ, विठ्ठलराव आवरगंड, बालासाहेब आवरगंड, मोतीराम भुजबळ, गोपीनाथ आवरगंड, आदी ग्रामस्थ स्वागतासाठी उपस्थित होते तसेच बस चालू झाल्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी  समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या