🌟कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीच्या अध्यक्षा ॲड.वृषालीताई बोंद्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
✍️ मोहन चौकेकर
बुलढाणा/चिखली : चिखली शहरातील अनुराधा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नुकतेच " वन महोत्सव " चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फळांची, फुलांची , तर काही शोभेची अशी एकूण ३०० वृक्षांची रोपे शाळेमध्ये लागवड करण्यास आणली होती. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीच्या अध्यक्षा ॲड.वृषालीताई बोंद्रे व स्कूलच्या मार्गदर्शक सल्लागार सुजाता कुल्ली मॅडम, स्कूलचे प्राचार्य बालैया गंगाराबोयिना, प्री-प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका जया नन्हई मॅडम यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले ; तसेच ॲड. वृषाली ताईं बोंद्रे व माननीय सुजाता कुल्ली मॅडम यांनी वृक्ष संवर्धन ही काळाची नितांत गरज आहे हे विशद करून विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन यावेळी बोलताना केले. या वृक्षारोपण प्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी कर्मचारी यांनी शाळेच्या विशाल निसर्ग रम्य परिसरात अतिशय उत्साहात विविध रोपे लावली. आणि या वृक्षारोपण प्रसंगी वरूण राजाने( पावसाने )ही आपली हजेरी आवर्जून लावली हे विशेष. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव, माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे व ॲड. वृषाली ताईं बोंद्रे, माननिय सुजाता कुल्ली मॅडम, प्राचार्य बालैया गंगाराबोयिना, प्री-प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका जया नन्हई मॅडम यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या