🌟जिल्हा पोलिस दलाचे आवाहन : अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार🌟
परभणी (दि.१६ जुलै २०२४) : परभणी शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी सोशल मिडीयावर जातीय व धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट किंवा कॉमेंट्स करु नयेत अथवा स्टेट्स ठेवू नये असे आवाहन परभणी जिल्हा पोलिस दलाने केले आहे.
बाहेरील जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणांवर तेथील स्थानिक प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कार्यवाही केलेली आहे त्यामुळे नागरिकांनी सदर घटनेच्या अनुषंगाने समाजात जातीय अगर धार्मिक तेढ निर्माण होणार्या पोस्ट किंवा कॉमेंट सोशल मीडियावर करू नये, अथवा स्टेटस वगैरे ठेऊ नयेत. त्याद्वारे अफवा पसरवू नयेत व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे. परभणी पोलिसांतर्फे अशा पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत असून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.....
0 टिप्पण्या