🌟स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना टिळकांनीनी केली होती🌟
फुलचंद भगत
वाशिम :- अत्याचारी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध व गुलामगिरीविरुद्ध पेटून उठून आपली ज्वलंत लेखणी आणि विचारांद्वारे जनतेला स्वराज्याचे बाळकडू पाजणारे, सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणारे महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी दि. २३ जुलै रोजी स्थानिक मंगरुळपीर येथील वाय सी प्री प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये अभिवादन करण्यात आले.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना टिळकांनी नी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. कारण स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. लोकमान्य टिळक हे नुसते कल्पनावादी नव्हते, ते मुत्सद्दी राजकारणी होते. ते जनतेशी वैचारिक देवाणघेवाण करणारे जन-नेते होते. आपली वृत्तपत्रे सुरू करताना जी परिस्थिती होती, तिचे राजकीय विश्लेषण करून त्यांनी आपले राजकीय डावपेच ठरवले होते. त्यांच्या या कार्याला ऊजाळा म्हणून सर्वञ जयंती साजरी करण्यात येथे.मंगरुळपीर येथील वाय सी प्रि प्रायमरी इंग्लीश स्कुलमधेही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.शिक्षकवृदांनी टिळकांच्या जीवनकार्यावर भाषणातुन प्रकाश टाकला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दानिश मोहन,निलेश पाटील,मिरज भुरीवाले,वैशाली गावंडे,रोशनी राऊत,निता नरळे,शितल मुळे,अश्वीनी गायकवाड,प्रतिमा शेरेकर यांचेसह शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मोलाचे योगदान दिले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या