🌟असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे🌟
परभणी (दि.19 जुलै 2024) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या आर्थिक वर्षापासून सुरु केली आहे या योजनेमध्ये खाजगी व निमशासकीय आस्थापनांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. यासाठी 12 वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना 6 हजार, आयटीआय किंवा पदविका प्रशिक्षणार्थ्यांना 8 हजार आणि पदवीधर व पदव्युतर प्रशिक्षणार्थ्यांना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा 18 ते 35 वर्षे वयोगटातील व्यक्तींना प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. शिक्षण सुरु असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवारांनी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महास्वयंम संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
या प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे. या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना व उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ यामध्ये मंजूर पदांच्या 5 टक्के उमेदवारा कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.
गावागावात नेमणार आता योजनादूत शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिध्दी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी योजनादूत नेमण्याची योजना सन 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय राबविली जाणार आहे. त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5 हजार लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे एकूण 50 हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनादूतांचे विद्यावेतनही या योजनमधून अदा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.....
0 टिप्पण्या