🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव-फुकटगावला जोडणाऱ्या उध्वस्त रेल्वे भुयारी रस्त्यावरून नागरिकांचा जिवघेणा प्रवास....!


🌟दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांची गुत्तेदाराला खुली सुट ? मागील तिन वर्षांपासून काम रखडले🌟 

पुर्णा (दि.१६ जुलै २०२४) :- भारताला इंग्रजांच्या अत्याचारी राजवटीतून स्वातंत्र मिळून ७७ वर्षे तर मराठवाड्याला निजामाच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाली तरी देखील मराठवाड्यातील अनेक गावं खेड्यांची अवस्था आज देखील अत्यंत दयनीय असून अनेक गावं खेड्यांतील नागरिक आज देखील मुलभूत नागरी सुविधांपासून कोसो दुर असल्याचे पाहावयास मिळत असून भ्रष्ट प्रशासन व्यवस्था व विकासाच्या नावावर प्रशासनाकडून येणाऱ्या कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी बोगस व निकृष्ट कामांची मालिका चालवणारे भ्रष्ट ठेकेदार व डोळे असून अंध अपंगाची भुमिका साकारणारे कागदी गांधीप्रेमी तत्वभ्रष लोकप्रतिनिधीच यास जवाबदार असल्याचे निदर्शनास येत आहे


एकंदर अशीच अवस्था पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील गावकऱ्यांची देखील झाल्याचे पाहावयास मिळत असून कान्हेगाव-फुकटगावला जोडणाऱ्या मधल्या मार्गावरील रेल्वे भुयारी मार्गासह पुलाचे काम मागील दोन ते अडीच वर्षांपासून संबंधित कामाचे आंतरराज्यीय गुत्तेदार अत्यंत संथगतीने करीत असल्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या कान्हेगाव येथील सर्वसामान्य नागरिक शेतकरी महिला शेतकरी अबालवृद्ध तसेच शाळकरी विद्यार्थी/विद्यार्थीनींना अक्षरशः या रेल्वे भुयारी मार्गातून जिवघेणा प्रवास करावा लागत असून अनेक दुचाकी/चारचाकी वाहन ऑटो उलटून तर पडतच आहेत याशिवाय महिला शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनीं देखील या रस्त्यावरील चिखलात पाय घसरून पडत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रेल्वे प्रशासनासह संबंधित गुत्तेदारा विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती निती सरकार यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी कान्हेगावातील गावकऱ्यांमध्ये होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या