🌟परभणी जिल्ह्यातील दूध भेसळविरोधात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत.....!


🌟दुधात भेसळ आढळ्याल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ.काळे यांनी केले🌟

परभणी (दि.25 जुलै 2024) :- परभणी जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी शासन निर्णयान्वये अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य अप्पर पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, उपनियंत्रक वैध मापन शास्त्र तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी परभणी यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

या जिल्हास्तरीय गठीत समितीव्दारे जिल्ह्यातील ग्राहकास स्वच्छ व निर्भेळ दूध मिळण्याच्या दृष्टीकोणातून गुणवत्तापूर्वक दूध पुरवठा होण्याच्या अनुषंगानेही समिती गठीत करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय गठीत समितीमार्फत भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे उत्पादक व वितरकावर नियंत्रण ठेवण्यासाठी व भेसळ आढळून आल्यास कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यामध्ये दूध तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जनतेने दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे आढळून आल्यास तसे जिल्हा समितीच्या निदर्शनास आणून द्याव्यात. यासाठी 7028975001/9923689168 या टोल फ्री क्रमांक  तक्रार नोंदविण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ.काळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या