🌟त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी नातू पणतू असा मोठा परिवार आहे🌟
पुर्णा :- पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील यशोदाबाई गिन्यानदेव सोलव यांचे काल गुरूवार दि.२५ जुलै २०२४ रोजी वृद्धपकाळाने वयाच्या १०४ वर्षी निधन झाले.
त्याचा अंत्यविधी आज शुक्रवार दिनांक २६ जुलै रोजी दुपारी १२.०० वाजता बरबडी येथील हिंदु स्मशानभूमीत करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी प्रतिष्ठित नागरिक राजकारणी गावातील सर्व मंडळी उपस्थित होते त्यांचा शांत संयमी स्वभाव असल्यामुळे बडबडी येथील नागरिक हळहळ व्यक्त करीत होते त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी नातू पणतू असा मोठा परिवार आहे बराशिव कारखान्याचे जनरल मॅनेजर सुभाष सोलव यांच्या त्या आजी होत.....
0 टिप्पण्या