🌟महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा स्तुत्य उपक्रम : ‘आषाढी’साठी दोनशे बसेसचा ताफा....!


🌟राज्य परिवहन महामंडळाद्वारे भक्कम तयारी : वारकर्‍यांच्या दृष्टीने उपयुक्त सोयी सुविधा🌟

परभणी (दि.१५ जुलै २०२४) :  तीर्थक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी जाणार्‍या वारकर्‍यांकरीता आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातून सुमारे २०० बसेसचा ताफा तैनात केल्या आहेत.

             या जिल्ह्यातून दरवर्षी हजारो वारकरी आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरला ये-जा करीत असतात. यावर्षीसुध्दा या जिल्ह्यातून हजारो भाविक पंढरपूरकडे रवाना होतील, असे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवरच राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रणकांनी एसटीच्या २०० बसेसचा ताफा यात्रेकरीता तैनात केला आहे. परभणी विभागातील वसमत, कळमनूरी, हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी आगारातून या बसेस धावणार आहेत. आषाढी निमित्ताने या दोनशें बसेस किमान सातशें फेर्‍या करतील, असाही अंदाज व्यक्त होत आहे.

            दरम्यान, गाव पातळीवरुन ४० वारकर्‍यांचा जत्था पंढरपूरकडे जाऊ इच्छित असेल तर त्या वारकर्‍यांकरीता त्या गावातूनच या व्यतिरिक्त खास बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी किमान ४० वारकर्‍यांची संख्या असावी, अशी अट आहे. विभाग नियंत्रक सचिन डाफळे व विभागीय वाहतूक अधिकारी अमृतराव कच्छवे यांनी या संदर्भात वारकर्‍यांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या