🌟या कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
परभणी (दि.23 जुलै 2024) :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्र लाभार्थी महिलांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त लाभार्थींनी सहभागी होण्यासाठी अंगणवाडी सेविका-पर्यवेक्षिका आणि तलाठी, ग्रामसेवकांची प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पालम येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार कैलास वाघमारे, गटविकास अधिकारी (पंचायत समिती) उदय शिसोदे, एकात्मिक बाल विकास योजनेच्या योगिता माटे यांच्यासह तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जनजागृती करणे आवश्यक आहे. या योजनेच्या पात्रतेसंदर्भातील अनेक अटी शिथिल झाल्या आहेत. याची सर्व सामान्य कुटुंबातील महिलांना माहिती द्यावी. राखी पौर्णिमेपर्यंत तालुक्यातील किमान 50 टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी या योजनेचे पात्र लाभार्थी घरोघरी जाऊन शोधावेत, असे आवाहन आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी महिलांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरून घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच योजनेमध्ये पात्र महिला लाभार्थी ठरविताना संबंधित महिलांना योजनेच्या अटी-शर्थींची माहिती देत, पात्रतेचे निकष, अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा, पात्र लाभार्थी, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आदींची माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी विस्तार अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक व पर्यवेक्षिका यांनी परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या