🌟श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने नवनाथ पारवे यांच्या सेवा गौरव सोहळ्याचे ३१ जुलै रोजी आयोजन🌟
पुर्णा (दि.२७ जुलै २०२४) :- पुर्णा तालुक्यातील गौर येथील नामांकित श्री सोमेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे लिपीक तथा दैनिक लोकमत वृत्तपत्राचे ग्रामीण भागातील पुर्व जेष्ठ पत्रकार श्री.नवनाथ पारवे हे श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तब्बल ३१ वर्षे १ महीना २० दिवसांची प्रदिर्घ यशस्वी सेवा बजावून दि.३१ जुलै २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने लिपिक नवनाथ पारवे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या सेवा गौरव सोहळ्याचे बुधवार दि.३१ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री सोमेश्वर विद्यालय गौर येथे आयोजन करण्यात आले असून या सेवा गौरव सोहळ्यास परमपूज्य श्री महंत १००८ जिवनदासजी महाराज चुडावेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या सेवा गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन.बी.राजभोज तर प्रमुख अतिथी म्हणून वाशिम जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अत्यंत कर्तव्यदक्ष व मनमिळाऊ कर्मचारी म्हणून ओळखल्या जाणारे लिपीक नवनाथ पारवे यांचा जन्म पुर्णा तालुक्यातील गौर येथे दि.१५ जुलै १९६६ रोजी झाला त्यांनी इयत्ता ०१ ली ते ०७ वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण गौर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले तर इयत्ता ०८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण पुर्णा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हायस्कूल येथे झाले तर इयत्ता ११ वी ते १५ वी (पदवी) पर्यंतचे शिक्षण त्यांनी पुर्णेतील श्री गुरबुध्दी स्वामी महाविद्यालयातून पुर्ण केल्यानंतर त्यांनी श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लिपीक म्हणून दि.११ जुन १९९३ रोजी पदभार स्वीकारला लिपीक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नवनाथ पारवे यांनी आपल्या पदाशी एकनिष्ठ राहून संस्थेत अविरत ३१ वर्षे १ महीना २० दिवसांची प्रदिर्घ यशस्वी सेवा बजावल्यानंतर ते नियत वयोमानानुसार ३१ जुलै २०२४ रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सन्मानार्थ श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन केले असून या सेवा गौरव सोहळ्यास गौर ग्रामस्थांसह,विद्यार्थी विद्यार्थीनीं व तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक,व्यापारी,शिक्षण क्षेत्रातील अधिकारी/कर्मचारी आदींसह पत्रकार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवा गौरव सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या संस्थेतील सर्व संस्था पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.......
0 टिप्पण्या