🌟पुर्णेतील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत सांस्कृतिक दिवस उत्साहात साजरा....!


🌟विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नैसर्गिकरित्या विकास व्हावा विद्यार्थी अभिव्यक्त व्हावेत याकरिता शिक्षण सप्ताहाचे आयोजन🌟


पुर्णा (दि.२६ जुलै २०२४) :- पुर्णा शहरातील मस्तानपुरा परिसरातील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय कन्या पूर्णा शाळेत शिक्षण सप्ताह निमित्त सांस्कृतिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नैसर्गिकरित्या विकास व्हावा विद्यार्थी अभिव्यक्त व्हावेत याकरिता शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.हा सप्ताह दिनांक २२ जुलै ते २८ जुलै २०२४ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे या दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या केंद्रीय कन्या पुर्णा शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.


त्या अनुषंगाने चौथ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कोळीनृत्य, विविध वेशभूषा सर्वांमध्ये आहे भारुड, गवळण,लोकगीते,कोळीनृत्य,विविध वेशभूषा, माती काम,या सर्वांन मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कलेची चुणूक दाखवली शाळेचे मुख्याध्यापक  वंदना साने मॅडम,शारदा राक मॅडम,पुष्पलता दासरवार मॅडम,संगीता (बोगळे) पाथरकर  मॅडम,बाबासाहेब काशीदे सर अथक परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या