🌟आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन दिन : जाणून घेरे आता निसर्ग आपली माता.....!


🌟जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो🌟

        जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवशी काही लोक निसर्गाप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्या लक्षात ठेवून त्या पूर्ण करण्याची शपथ घेतात. मात्र तरीही निसर्गाची पर्वा न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊय. आपण निसर्गाला आई म्हणतो कारण तिने आपल्याला जन्म दिला आहे. ती आपली काळजीही घेते. पण हळूहळू आपण आपल्या आईप्रमाणे निसर्गाला हलके घेत आहोत, त्याचा परिणाम भविष्यात खूप गंभीर होणार आहे. वन्यजीव, नैसर्गिक संसाधने, झाडे, महासागर आणि पर्वत याशिवाय निसर्गाकडून भरपूर खनिजे आणि अनेक सुविधा आपल्याला मिळाल्या आहेत, ज्यामुळे आपण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो. पण खेदाची गोष्ट म्हणजे त्यांची काळजी घेण्याऐवजी आपण त्यांची नासाडी करत आहोत.पृथ्वीप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची आठवण केली पाहिजे. कालांतराने मानवजातीने निसर्गाने दिलेली संसाधने संपुष्टात आणली, वन्यजीवांचा नाश केला. आपल्यासाठी अत्यावश्यक असलेली हवा, ज्यामध्ये आपण राहतो, तीही प्रदूषित झाली आहे. असे असूनही, निसर्ग आपल्याला वेळोवेळी संकेत देत राहतो आणि सांगतो की, सावधगिरी बाळगण्याची अजून वेळ आहे. अशा परिस्थितीत आपण आताही पृथ्वीचे आणि तिच्या संसाधनांचे रक्षण केले नाही तर खूप उशीर होईल. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आज म्हणजेच २८ जुलै हा जागतिक निसर्ग संवर्धन दिन लोकांना पुन्हा एकदा पृथ्वीप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जात आहे. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.

जागतिक निसर्ग संवर्धन दिन इतिहास असा की, जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोकांमध्ये निसर्ग संवर्धनाच्या महत्त्वाविषयी जनजागृती केली जाते. प्रत्येकाच्या लहानशा योगदानाने, आपण आपला ग्रह वाचवू शकतो आणि आपल्याला वारशाने मिळालेला निसर्ग पुनर्संचयित करू शकतो. या दिवसाचा इतिहास काय आणि त्याची सुरुवात कशी झाली याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. तथापि, कालांतराने, हवामानातील बदल आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीची स्थिती किती वाईट झाली आहे हे आपल्याला दिसून आली आहे. आता वेळ आली आहे, की आपण सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात आणि निसर्गाचा कोप दाखवण्याची संधी देऊ नये.जागतिक निसर्ग संवर्धन दिन महत्त्व असे की, अनेक वर्षांपासून हवामान बदल ही गंभीर समस्या आहे. ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण आणि प्रजाती नष्ट होण्यामुळे निसर्गात प्रचंड असंतुलन निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. याशिवाय आपल्या सवयी आणि सुखसोयींचा पृथ्वीवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या दिवशी निसर्ग समजून घेऊन त्याच्या हितासाठी कार्य करण्यास प्रोत्साहित केले जाते. त्यासाठी अनेक कार्यक्रम आणि चर्चासत्रेही आयोजित केली जातात. तथापि, आपण सर्व गोष्टींपासून वर उठून स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत कारण प्रत्येक थेंब एक महासागर बनवतो. निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी हा ‘नेचर कॉन्झर्वेशन डे’ जगभर पाळला जातो. मूळ संकल्पना व सुरुवात

विकास (डेव्हलपमेंट) म्हणजे आपले उद्दिष्ट साधण्याच्या आड येणारे सर्व काही नष्ट करायचे अशी चुकीची संकल्पना. आधुनिक व सुखासीन जीवनशैलीमधून, रुजू लागल्याने पृथ्वीवरील नैसर्गिक समतोल बिघडला. त्याचे परिणाम लवकरच दिसू लागल्याने निसर्ग संरक्षणाची आणि संवर्धनाची जाणीव सर्वांच्या मनात ठसविणे गरजेचे बनले. वस्तू आणि संसाधनांचा पुनर्वापर केल्यानेही खूप चांगला फरक पडतो असेही दिसून आले आहे सद्या आपण वापरत असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात. परंतु आपण ती संपविण्याचाच निश्चय केल्यासारखी स्थिती आहे. यामुळे वने, वन्यजीव, वनांतून मिळणारे पदार्थ, खनिजे आणि खनिज इंधने... सर्वच मौल्यवान स्रोतांवर असह्य ताण आला आहे व त्याचे परिणाम थोड्याच वर्षात वापरकर्त्याला म्हणजे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. जीवनशैलवर नियंत्रण ठेवणे आणि वस्तूंचा पुनर्वापर (३ आर म्हणजे रिड्यूस, रीयुज, रिसायकल) हा उपाय सर्व पातळ्यांवर केल्यासच आशेचा किरण आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तरच हा दिवस सार्थकी ठरू शकतो. जागतिक निसर्ग संवर्धन दिन इतिहास- जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोकांमध्ये निसर्ग संवर्धनाच्या महत्त्वाविषयी जनजागृती केली जाते. प्रत्येकाच्या लहानशा योगदानाने, आपण आपला ग्रह वाचवू शकतो आणि आपल्याला वारशाने मिळालेला निसर्ग पुनर्संचयित करू शकतो. चांगले पर्यावरण आणि निरोगी मानवी समाजासाठी आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. दरवर्षी २८ जुलै हा दिवस जगभरात जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून ओळखला जातो. पृथ्वीच्या पर्यावरणातून नामशेष होत असलेली वृक्ष आणि प्राण्यांचे संरक्षण करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. पाणी, वायु,माती, उर्जा, वनस्पती, खनिज,जीव जंतु यासारख्या निसर्गातील विविध घटकांचे संरक्षण करुन निसर्गाची सुंदरता अबाधित राखणे हे निसर्ग संवर्धन दिनाचे प्रमुख महत्त्व आहे. प्रसिद्ध रुस लेखक लियो टॉलस्टॉयउघ्दृत यांनी असे म्हटले आहे की, माणूस आणि निसर्गामध्ये असलेली साखळी कधीच तोडू नये. ही आनंद मिळवण्यासाठीची पहिली अट आहे. एक उत्तम पर्यावरण एक स्थिर आणि उत्पादक समाजाला मिळालेली देणगी आहे. वर्तमान आणि भविष्यात पुढच्या पिढीचे आयुष्य सुनिश्चित करण्यासाठी निसर्गाचे संवर्धन, त्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

               जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचा इतिहास फारसा कोणाला माहिती नाही. मात्र २८ जुलै हा दिवस दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मानवाने आपल्या सुख सोयीसोयींसाठी निसर्गाच्या केलेल्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा आजचा दिवस आहे. निसर्गाचे आपल्या परिने कसे संवर्धन करता येईल यासाठी एक पाऊल उचलणे, जनजागृती करण्याचे काम आजच्या दिवशी केले जाते. निसर्गाचे संवर्धन न केल्याने माणसांना ग्लोबल वॉर्मिंग, विविध आजार, वातावरणीय बदल, प्राकृतिक बदलांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला चांगले आयुष्य हवे असल्यास आपल्या जवळ असलेल्या सुंदर निसर्गाचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

!! जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!

                      - संकलन व सुलेखन -

           श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                      फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या