🌟कागदावर घरकुल पुर्ण दाखवुन शासनाच्या निधीला चुना लावणार्‍यावर कारवाई होणार की 'घेवुन देवुन सेटलमेंट' करणार ?


🌟वेळेत बांधकाम सुरू न करणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांवर होणार कारवाई🌟

🌟ग्रामपंचायत मार्फत घरकुल घरकुलाचे बांधकाम पुर्ण न करणार्‍या लाभार्थ्यांना नोटीस🌟

फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२३ ते २०२४ या कालावधीत निवासी प्रयोजनासाठी घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात येऊन पहिला हप्ता तर काहींना दुसराही हप्ता वितरित करण्यात आला.शंभर दिवसात बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित असतांनाही घरकुलांचे बांधकाम सुरूच झालेले नसल्याचे समोर आले तर काहींनी अर्धेच बांधकाम करुन काम थंडबस्त्यात ठेवलेले दिसते. अशा लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने प्रक्रीया सुरु केलेली आहे.काही ग्रा.पं.कडुन सात दिवसात घरकुलाचे काम पुर्ण करण्याच्या नोटीसही देण्यात आल्याने खळबळ ऊडाली आहे.नोटीस देवुनही लाभार्थ्यांनी घरकुलाचे हप्ते घेवुन घरकुल न बांधल्यास गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेतर्फे सुरू करण्यात येणार आहे अशी माहीती मिळाली आहे.

               यापुढे मंगरुळपीर तालुक्यात आणी वाशिम जिल्ह्यात पहिला किंवा दुसरा हप्ता वितरित करण्यात येऊन देखील शंभर दिवसाच्या आत बांधकामे पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांच्या मालमत्तांवर बोझे चढविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे असे कळते.मंगरुळपीर तालुक्यात ज्या ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी परवानगी देण्यात येऊन पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे अशा लाभार्थ्यांच्या समक्ष भेटी घेतल्या जात आहेत.घरकुलाची पाहणीही अधिकार्‍यामार्फत केल्या जात आहे.घरकुल योजनांसाठी मिळणारा निधी कमी पडत असल्याने घरकुल बांधकाम अर्धवटच राहत असल्याची व्यथाही लाभार्थ्यांनी सांगीतली.अधिकार्‍यांनी घरकुल बांधकामाच्या स्थीतीची पाहणी करून अर्धवट बांधकामवाल्यांना घरकुल बांधुन पुर्ण करण्यासाठी सात दिवसाच्या मुदतीच्या नोटीसी देण्यात आल्या आहेत.त्यात समर्पक उत्तर न देणाऱ्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.घरकुलासाठी दिलेल्या निधीचीही घरकुल न बांधणार्‍या लाभार्थ्याकडुन रिकवरी करण्यात येणार आहे.

* घरकुल न बांधताच जुने घर दाखवुन निधी हडपणारांवर प्रशासन काय कारवाई करणार ?

मंगरुळपीर तालुक्यात काही लाभार्थ्यांनी अधिकार्‍यांशी व सबंधीत कर्मचार्‍यांशी हितसबंध साधत शासनाला चुना लावला आहे.घरकुल मंजुर झाल्यावर जुनेच घर दाखवुन सर्वच्या सर्व हप्ते निधीची ऊचल करुन शासनाला फसवल्याचा प्रकार घडल्याच्या लेखी तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या.सबंधितांच्या घरकुलाची पाहणी करण्यात आली परंतु अद्याप कारवाई माञ झाली नसल्याने चौकशी सध्या गुलदस्त्यातच दिसते.दोषींवर गुन्हे दाखल होणार की घेवुन देवुन सेटलमेंट होणार याकडे जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी मंगरुळपीर तालुक्यातील घरकुल तक्रारीची स्वतः चौकशी करावी अशीही मागणी जोर धरत आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील घरकुल योजनेची स्थीती :-

रमाई आवास योजना-23-24 

उद्दिष्टे 600

मंजूर 535

प्रथम हप्ता दिलेले 493

दुसरा हप्ता दिलेले 213

मोदी आवास योजना- 23-24

एकूण उद्दिष्टे 2067

प्रथम हप्ता दिलेले 1895

दुसरा हप्ता दिलेले 1374

हे बांधकाम सुरू आहेत

शबरी आवास योजना- 23-24

उद्दिष्टे 180

मंजूर 178

प्रथम हप्ता दिलेले 157

दुसरा हप्ता 32

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या