🌟वाशिम जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात स्टॉप डायरिया अभियानांतर्गत कार्यशाळा संपन्न.....!


🌟डायरिया टाळण्यासाठी स्वच्छतेची कास धरा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचे नागरिकांना आवाहन🌟 


फुलचंद भगत

वाशिम:-गावस्तरावर वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता पाळल्यास जुलाब (डायरिया) या आजाराला थोपवता येऊ शकते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले विस्तार अधिकारी, सीडीपीओ, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका शिक्षण अधिकारी बीआसी- सीआरसी यांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

                वाशिम जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात आयोजित कार्यशाळेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश साहु, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.डायरिया हा घातक आजार होऊ नये म्हणुन ग्रामस्थांना काय संदेश द्यावा याविषयी बोलतांना सईओ वाघमारे म्हणाले, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याचे पाणी किमान ५ मिनीट उकळत राहील अशा पध्दतीने उकळुन थंड झाल्यानंतर स्वच्छ कापडाने गाळून घेण्याबाबत माहिती द्यावी. १० लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये २ ते ३ थेंब जिवनड्रॉप नियमीत टाकुन वापर करा. तसेच डायरियाचे (जुलाब) लक्षण आढळल्यास प्रथम उपचारात एक लिटर पाण्यामध्ये ८ चमचा साखर व १ चमचा मिठ (ORS) या जलसंजिवनीचा वापर करण्याबाबतचे संदेश गावस्तरावर देण्याचे निर्देश दिले. गावातील पाईप लाईन लिकेज वॉल दुरुस्त करण्याबाबतचे निर्देशही सीईओ यांनी दिले. वरील सर्व बाबींची जाणीव जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले माहिती पत्रकाचे वितरण कुटुंबस्तरावर करण्याचे निदेशही यावेळी देण्यात आले.

यावेळी “स्वच्छतेचे दोन रंग- गृह भेटी अभियान” याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश साहू यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे ओडीएफ प्लसमध्ये मॉडेल करण्यासाठी या गृहभेट अभियानाचा उपयोग होणार असून प्रत्येक गावामध्ये पाच संवादकांच्या माध्यमातून दररोज 25 घरांना भेटी देण्याबाबत व माहिती गुगल फॉर्मवर भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पुढील एक महिनाभर हे अभियान प्रत्येक गावामध्ये राबविण्यात येणार असुन विस्तार अधिकारी पंचायत यांनी या अभियानाचे तालुकास्तरावरून सनियंत्रण करावे असेही साहु यांनी यावेळी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे यांनी या कार्यशाळेत डायरियाची लक्षणे, परिणाम व उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले गावातील उघड्यावरील हागणदारी पुर्णपणे बंद झाली आणि लोकांनी शौचालयाचा शंभर टक्के वापर केल्यास दुषित पाण्यापासुन होणाऱ्या अनेक आजारांवर आपण मात करु शकतो असे ठोंबरे यांनी सांगितले. जल जीवन मिशनचे शंकर आंबेकर,  राम श्रृंगारे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. संचालन शंकर आंबेकर यांनी केले व पाणी गुणवत्ता सल्लागार अभिजित दुधाटे यांनी आभार मानले. जिल्हा कक्षाचे सल्लागार प्रफुल्ल काळे, रविचंद्र पडघान, विजय नागे, पुष्पलता अफुणे, अमित घुले, प्रवीण पान्हेरकर, प्रदीप सावळकर, अभय तायडे, समाधान खरात यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या