🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून कठोर कारवाईची मागणी🌟
परभणी (दि.१९ जुलै २०२४) :- परभणी जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दि.१९ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथे मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळ व घरांवरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत या घटने विरोधात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
परभणी जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की दि.१४ जुलै २०२४ रोजी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळ व घरांवरती भ्याड हल्ला केला आहे. यातून कुणीतरी हिंदू मुस्लिम एकतेला गालबोट लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. तरी सदर घटनेचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आहे. तसेच त्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.....
0 टिप्पण्या