🌟शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेनी पदाधिकाऱ्यांना केले आवाहन🌟
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही राज्यात परिवर्तन करायचे असेल तर शिवसैनिकांनी जनतेत जावे अशी सूचना शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केले.शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त ता. १९ जुलै रोजी कन्नड विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना पिशोर येथे ते बोलत होते. चिंचोली, करंजखेड, चिकलठाण व पिशोर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संवाद साधला.
पक्षाची संघटनात्मक ताकद गाव पातळीपर्यंत मजबूत असायला हवी अशा पद्धतीनेच सर्व पदाधिकाऱ्यांचे लक्ष असायला हवे. पक्षाच्या स्वर्णीम काळाप्रमाणे शिवसेनेची संघटना मजबूत झाली पाहिजे.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक गावांमध्ये शिवसेनेची सदस्य नोंदणी करून घ्यावी अशी सूचना अंबादास दानवे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या कामाची माहिती घेऊन शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिवसैनिकांनी पोहोचले पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत तीन टप्प्यांमध्ये आपल्याला शिवसेनेची सदस्य नोंदणी करून घेण्याची असून पहिल्या टप्प्यामध्ये किमान ५० जणांची सदस्य नोंदणी झाली पाहिजे. अशाप्रकारे तीन टप्प्यांमध्ये प्रत्येक बुथवर १५० जणांच्या नोंदणीचा कार्यक्रम आपलयाला हाती घेण्याचे असल्याचे अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सुचित केले.
शिवसेनेचा संपूर्ण इतिहास संघर्षाचा राहिलेला आहे. सध्या तरी शिवसेनेच्या पाठीशी मोठी राजकीय शक्ती असुन काही वर्षांपूर्वी काहीही नव्हती.तशा परिस्थितीतही शिवसैनिकांनी सत्ताधारी पक्षाचे विरोधात लढाई करून जनतेचे काम केलेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारचा शिवसैनिक प्रचंड मजबूत असायला हवा, प्रशासन काम करत नसेल तर त्याला शिवसैनिकांची आदरयुक्त भीती वाटायला हवी. सध्याचे सत्तेतील सत्ताधारी हायब्रीड असून त्यांना भिण्याचे काही कारण नाही.आगामी विधानसभा निवडणुकीत ते दिसणारही नाही अशी त्यांची परिस्थिती होणार आहे.त्यामुळे गद्दारांना घाबरून न जाता शिवसैनिकांनी नेहमी अन्यायाविरुद्ध काम करायला हवे असा संदेश अंबादास दानवे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिला.
याप्रसंगी माझ्यासमवेत आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, किसान सेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब मोहिते,उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवळे,संतोष जेजूरकर,तालुकाप्रमुख संजय मोटे, विधानसभा संघटक डॉ.आण्णासाहेब शिंदे, शहरसंघटक सचिन तायडे, दिपक पवार,शहरप्रमुख गंपू जाधव , उपतालुकाप्रमुख गोकुळ डहाके, संजय पिंपळे, साईनाथ वेताळ, विभागप्रमुख विलास पवार, अशोक मोकासे, कल्याण चव्हाण, ज्ञानेश्वर वेताळ,महिला आघाडी उपजिल्हा संघटिका हर्षालीताई मुठ्ठे,तालुका संघटिका रुपालीताई मोहिते व युवासेना जिल्हाधिकारी उमेश मोकासे उपस्थित होते....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या