🌟राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करावेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डयांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. गणेशोत्सवापूर्वी हे महामार्ग खड्डेमुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात आयोजित बैठकीत दिले.
या दोन्ही महामार्गांच्या कामांची पाहणी करण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी जाहीर केले. बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते......
0 टिप्पण्या