🌟परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे काँग्रेस किसान सेलची मागणी🌟
परभणी (दि.25 जुलै 2024) : तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांचेही सरसगट पीक कर्ज माफ करावे व पीक विमा भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस किसान सेल अध्यक्ष श्रीधर देशमुख व काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.
गेल्या वर्षाभरापासुन शेतकर्यांच्या शेतमालास काडीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. 4 हजार ते 4 हजार 200 रुपये प्रती फ्रीर्टल सोयाबीन विक्री करुन 3 हजार 500 ते 4 हजार रुपये प्रती बॅग सोयाबीन बियाणे खरेदी करावी लागत आहे. त्यातच डी.ए.पी. सारख्या खतामध्ये भेसळ होत आहे. अशा अनेक तक्रारी प्रत्येक जिल्ह्यात दिसुन आल्या आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.
19 जूलै 2024 पासुन जिल्ह्यात सतत रिमझिम पाऊस सुरु असल्यामुळे पिकाची परिस्थिती रोगराईमुळे अत्यंत बिकट आहे. जिल्ह्यातील पाणी पातळी खुप खोलवर गेली आहे. शेतकर्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांचे पिक कर्ज संपुर्ण माफ करावे व पिक कर्ज माफी लवकरात लवकर जाहीर करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल, असा इशारा या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान, यावेळी आमदार वरपूडकर, इरफान उर रहमान खान, भगवान वाघमारे, धोंडीराम चव्हाण, शहराध्यक्ष नदीम इनामदार, किसान सेलचे अध्यक्ष श्रीधर देशमुख, गुलमिर खान, प्रवक्ते सुहास पंडीत, विनोद कदम, विनय बांठीया, पवन निकम, प्रल्हाद अवचार, सुदर्शन कदम अहजम खान यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते......
0 टिप्पण्या