🌟यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव सचिन भारसाकळे यांची विशेष उपस्थिती🌟
फुलचंद भगत
वाशिम:-महसूल कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याबाबत सरकारतर्फे कुठली कार्यवाही किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वाशिम जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने दिनांक 11 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम समोर जिल्हाध्यक्ष रवि महाले यांचे नेतृत्वात दुपारच्या सत्रात आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात निदर्शने केली आहेत.
यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव सचिन भारसाकळे कोषाध्यक्ष रवि अम्भोरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथील महसुल कर्मचारी अतुल देशमुख गजानन उगले वाडेकर शितल गरुड अनिल घुगे अमित चव्हाण श्रीकांत वडोदे सुनील ठाकरे विजय सोनुने विनोद मारवाडी धनंजय आवटे गजानन कांबळे रवी दुबे नालट मारुती खंडारे श्रीमती कल्पना सोनटक्के श्रीमती सुचिता सरकटे श्रीमती आशा उगलमुगले श्रीमती दिपाली ठाकरे श्रीमती नलिनी सोनुने, श्रीमती नर्मदा ठाकरे श्रीमती भगत श्रीमती ज्योस्त्ना बनसोडे इत्यादी महसूल कर्मचारी उपस्थित होते.दि 13 जुलै रोजी आंदोलनाचा तिसरा टप्पा असुन सदर टप्पयात लेखणी बंद करण्यात येणार असल्याबाबत महसुल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि महाले यानी नमुद केले आहे.......
0 टिप्पण्या