🌟पुर्णा तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून शासनाचा करण्यात आला जाहीर निषेध....!


🌟सकल मराठा समाज बांधवांनी गाव नमुना नंबर ३३-३४ अभिलेखे साठी दिला आमरण उपोषणाचा इशारा🌟

पुर्णा (दि.२५ जुलै २०२४) :- पुर्णा तालुक्यातील गाव नमुना नं.३३-३४ अभिलेखे नोंदी उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा, १३ ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सकल मराठा समाज पूर्णा तालुका यांनी तहसीलदार माधव बोथीकर यांना आज गुरुवार दि.२४ जुलै रोजी निवेदनाद्वारे दिला. पूर्णा येथील भूमी अभिलेख कार्यालयात गेल्या आठ महिन्यांमध्ये केवळ बारा गावांच्या ३३_३४ अभिलेख नोंदवह्या उपलब्ध झाल्या आहेत.

तालुक्यातील उर्वरित गावातील मराठा समाजातील लोकांनी अर्जाद्वारे मागणी केली असता त्या ठिकाणी उडवा उडवी चे उत्तरे देऊन समाधान केले जात आहे‌. खरे तर गाव नमुना ३३_३४  अभिलेख नोंदवही  भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असायलाच पाहिजेत, परंतु तालुका प्रशासन याबाबतीत निष्काळजीपणा करत आहे ही बाब निदर्शनास आल्यामुळे येणाऱ्या दहा ऑगस्टपर्यंत  ३३_३४ अभिलेखे नोंद करून द्याव्यात, अन्यथा येणाऱ्या १३ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सकल मराठा समाज पुर्णा तालुका यांनी दिला आहे . तसेच अंतरवाली (सराटी) येथे मनोज जरांगे पाटील उपोषण करत असताना त्या ठिकाणी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, यांनी भेट दिली नाही. याचा अर्थ शासन जाणीवपूर्वक मराठा समाजाचा द्वेष करीत आहे, यासाठी सकल मराठा समाजांच्या वतीने शासनाने प्रशासन यांचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या