🌟या धम्म प्रबोधनास उपस्थित राहण्याचे आवाहन बोधिसत्व डॉ.बी.आर.आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समितीने केले आहे🌟
पुर्णा :- पुर्णा येथील बुद्ध विहार या ठिकाणी अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश बुद्ध विहार पूर्णा भदंत संघरत्न आम्रवन महाविहार देवगाव फाटा सेलु यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २१ जुलै २०२४ रोजी करण्यात आले आहे सकाळी ०५.३० वाजता बुद्ध विहारांमध्ये त्री रत्न वंदना परित्राण पाठ पूजा विधी संपन्न होईल.
दुपारी १२.३० सामूहिक बुद्ध वंदना वर्षावास अधिष्ठान धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर रवी सरोदे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रवी सरोदे उपकुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड नांदेड येथील प्रोफेसर डॉक्टर राजपाल चिखलीकर पी आर पी चे राष्ट्रीय सचिव बापूराव गजभारे महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूरचे प्राचार्य डॉ संजय गवई आदींची उपस्थिती असणार आहे.या धम्म प्रबोधन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा व धम्म सेवेत करत असलेल्या महिला मंडळांनी केले आहे......
0 टिप्पण्या