🌟जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या मान्यतेने ही समिती गठीत करण्यात आली🌟
✍️ मोहन चौकेकर
बीड : माजलगाव उपविभागातील महत्त्वाची असणारी दक्षता कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या कमेटी वर ॲड दशरथ मकसरे, श्री.राजेश घोडे,डोंगरचा राजाचे संपादक अनिल वाघमारे यांच्या नियुक्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील माजलगाव उपविभागाची महत्त्वाची असणारी दक्षता कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या मान्यतेने ही समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये समाज कल्याण सह आयुक्त छत्रपती संभाजीनगर,उपविभागीय पोलिस अधिकारी माजलगाव, तहसीलदार माजलगाव, तहसीलदार वडवणी, तहसीलदार धारूर, समाजकल्याण अधिकारी बीड, पोलिस निरीक्षक माजलगाव शहर, पोलिस अधीक्षक माजलगाव ग्रामीण, पोलिस निरीक्षक वडवणी, पोलिस निरीक्षक धारुर, पोलिस निरीक्षक दिंद्रुड, ॲड दशरथ मकसरे, श्री.राजेश घोडे, डोंगरचा राजाचे संपादक अनिल वाघमारे आदींची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या