🌟यापुढे सातत्याने वृक्ष लावण्याचा निसर्गमित्र समूहाचा मानस🌟
पुर्णा :- पर्यावरणाचे संवर्धन आणि मानवी जीवन सुखकर होण्याच्या दृष्टीने पूर्णेतील युवकांनी एकत्र येऊन निसर्ग मित्र समूह पूर्णा या नावे एका समूहाची स्थापना करून आज सोमवार दि.२२ जुलै रोजी शहरातील डॉ.आंबेडकर नगर आणि सिद्धार्थ नगर येथे वृक्षारोपण केले.
यापुढे सातत्याने वृक्ष लावण्याचा मानस समूहाने दाखविला आहे. आज सोमवार दि.२२ जुलै रोजी निसर्ग मित्र समुहाच्या वतीने वृक्षारोपणाची सुरुवात पूर्णेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली या उपक्रमात समूहाचे कार्यकर्ते, शिक्षक,वकील,रेल्वे कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला......
0 टिप्पण्या