🌟नांदेड येथील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात ९१ टक्के पाणीसाठा.....!

🌟धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ🌟 

नांदेड :- नांदेड येथील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज  दि.३० जुलै २०२४ रोजी ९१ % क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येऊ शकतो.

त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे,जीविताची,पशुधनाची,वीटभट्टी साहित्य व इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून  नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात यावी अशी विनंती शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी बंधारा प्रकल्प असर्जन नांदेडचे पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या