🌟परभणी जिल्ह्यातील अन्न व औषधी प्रशासनाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह ?🌟
परभणी/पुर्णा (विशेष वृत्त) :- परभणी जिल्ह्यासह पुर्णा शहर व तालुक्यात खुलेआम बनावट भेसळयुक्त पाकीटबंद व खुल्या खाद्यतेलासह अन्य खाद्यपदार्थांची विक्री होत असतांना जिल्ह्यातील अन्य व औषधी प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे की झोपेचे सोंग घेऊन भेसळयुक्त खाद्यतेल व खाद्यपदार्थ विक्रेत्या व्यापाऱ्यांची पाठराखण करीत आहे ? प्रश्न उपस्थित होत आहे.
परभणी जिल्ह्यातील असा एकही तालुका नसेल ज्या तालुक्यात बनावट व भेसळयुक्त पाकीटबंद तसेच खुल्या खाद्यतेलासह खाद्यपदार्थांची विक्री होत नसेल अन्य व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून प्रत्येक तालुक्यातील खाद्यतेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केल्यास फार मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही या पुर्णा तालुका निश्चितच आघाडीवर राहील पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात भेसळयुक्त खाद्यतेलासह बनावट पाकीटबंद खाद्यतेल देखील विक्री होत असल्याची चर्चा ग्राहकांतून होतांना दिसत आहे वाटेल ती किंमत देऊनही शुद्ध असे शेंगदाणा/करडी/सोयाबीन/तिळ/खोबरे आदी खाद्यतेल मिळेल याची कुठलीही गॅरंटीच नाही परंतु संबंधित खाद्यतेल खाद्यपदार्थ विक्रेते सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा गंभीर प्रकार करीत असतांनाच परभणी जिल्हा अन्न व औषधी प्रशासन नेमकी कोणती भूमिका वठवत आहे ? वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य जनता तसेच प्रसार माध्यमांच्या डोळ्यात धुळ झोपण्यासाठी वर्षीत एखाद्य वेळेस खाद्यपदार्थाचे काही नमुने पकडून अन्न व औषधी प्रशासन आपण किती कर्तव्यदक्ष/कर्तव्यतत्पर आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न वेळोवेळी करीत असते परंतु प्रत्यक्षात मात्र यातून इनपुट आऊटपुट काहीही निघत नाही.
परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यासह पुर्णा तालुक्यातील खाद्यतेल विक्रेते नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहत व नांदेड औद्योगिक वसाहत येथून पामतेल भेसळयुक्त खुल्या खाद्यतेलाचा साठा स्वतःचे ट्रक पाठवून दोन दोनशे लिटरच्या टाक्यांत भरुन पामतेल भेसळयुक्त खाद्यतेलसाठा रातोरात मागवून घेतात व या भेसळयुक्त खाद्यतेलाची मनमानी दराने ग्राहकांना विक्री करतात जाते या भेसळयुक्त निकृष्ट खाद्यतेलामुळे अनेकांना हृदयाविकारासह फुफ्फुसाच्या श्वासोच्छवासा संदर्भातील विविध गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे सदरील निकृष्ट पामतेल मिश्रीत खाद्यतेल मानवी आरोग्यास अत्यंत हानीकारक असतांना व राज्यात खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीवर प्रतिबंध असतांना देखील नांदेड/परभणी जिल्ह्यात या भेसळयुक्त खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात निर्मितीसह खरेदी विक्री होत असल्याचे निदर्शनास येत असून परभणी/नांदेड जिल्ह्यातील अन्न व औषधी प्रशासन (food and drugs administration maharashtra) मात्र खाद्यतेल तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात आतापर्यंत वर्षभरात एखादं दुसरी कारवाई करीत फार मोठ्या कारवाया केल्याच्या तोऱ्यात वावरत असतांनाच पाहावयास मिळाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील नांदेड/कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील खाद्यतेल निर्मिती कारखाना (Oil Mill) मधून पुर्णा तालुक्यातील खाद्यतेल विक्रेते शहरासह तालुक्यात सर्वत्र विक्रीसाठी आणत असलेले अत्यंत निकृष्ट व पामतेल भेसळयुक्त खाद्यतेल अत्यल्प दरात खरेदी करून ग्राहकांना मनमानी दराने विक्री करुन त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळत असतांना अन्न व औषध प्रशासन गांधी बाबांच्या माकडांची भुमिका वठवत आहे की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.......
0 टिप्पण्या