🌟छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्याची नियुक्ती करा.....!


🌟विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी🌟

संभाजीनगर -संभाजीनगरचे माजी पालकमंत्री माजी आमदार संदिपान भुमरे यांची लोकसभा सदस्य म्हणून निवड झाली असल्याने विधानसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मागील बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यासाठी पालकमंत्र्याची नियुक्ती करा, अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

  संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त झालेले असल्याने जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक आजतागायत होवु शकलेली नाही. तसेच संभाजीनगरचे पालकमंत्री पद रिक्त असल्याने संभाजीनगर जिल्ह्याचे नियोजन पूर्णतः ठप्प झाले आहे. संभाजीनगर जिल्ह्याला विविध विकास कामांसाठी प्राप्त झालेला निधी पालकमंत्री नसल्याने अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या विकासावर त्याचा विपरित परीणाम होणार आहे. तसेच आगामी काळात राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार असल्याने तात्काळ नियुक्ती करणे आवश्यक असल्याची सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची तातडीने नियुक्ती करुन संभाजीनगर जिल्ह्याला योग्य न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या