🌟याप्रसंगी प्राचार्य डाॅ.पवार यांच्या हस्तें लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले 🌟
पुर्णा (दि.२३ जुलै २०२४) :- पुर्णा शहरातील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात आज मंगळवार दि.२३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रामेश्वर पवार यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दिपमाला पाटोदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा .डॉ .प्रकाश सूर्यवंशी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या