🌟शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसैनिकांशी साधणार संवाद🌟
✍️ मोहन चौकेकर
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवसंकल्प मोहिम गुरुवार ता. २५ जुलै रोजी गंगापूर विधानसभेत संपन्न होणार आहे. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे.
सकाळी ९. ३० वाजता लासूर स्टेशन,सिल्लेगांव, आंबेलोहळ,सकाळी ११.३० वाजता गंगापूर - जामगांव, दुपारी २ वाजता शेंदुरवादा - तूर्काबाद, दुपारी ३ वाजता वाळूज - राजणगांव व दुपारी ५. ३० वाजता संभाजीनगर ग्रामीण पश्चिम मधील पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक बाबींवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माहिती घेणार आहे.
तालुका व जिल्हा पातळीवर अडकलेली कामे नागरिकांनी घेऊन यावे.सदरील दौरा दरम्यान तालुका पातळीवरील सर्व विभागांचे अधिकारी असल्याने जागेवरच कामे मार्गी लावली जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर असलेली प्रलंबित कामे नागरिकांनी घेऊन यावे असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे.
याप्रसंगी मोठया संख्येने शिवसेना पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी,शिवसैनिक व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण भाऊ सांगळे,अविनाश पाटील, बप्पा दळवी, राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, बाळासाहेब गायकवाड,माजी उपमहापौर राजू शिंदे, महिला आघाडी तालुका संघटिका अर्चना सोमासे, युवासेना जिल्हाधिकारी मच्छिंद्र देवकर व तालुकाधिकारी ऋषिकेश धाट यांनी केले आहे.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या