🌟प्रशासनाने या आंदोलनास गांभीर्याने न घेतल्यास या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा डिवायएफने दिला इशारा🌟
पुर्णा (दि.२२ जुलै २०२४) :- पुर्णा येथील बसस्थानकाची नव्याने बांधकाम करुन ग्रामीण भागांसह लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात याव्या या मागणीसाठी आज सोमवार दि.२२ जुलै रोजी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेने आंदोलन केले. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफ) या संघटने कडून मागील तीन वर्षांपासून पुर्णा बसस्थानक बांधून देण्यासाठी तसेच नवीन बसेस सुरु करण्यासाठी तसेच सद्या सुरू असलेल्या बसेसच्या फेऱ्या वाढविण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात येण्या जाण्यासाठी अतिरिक्त बसेस सुरु करण्यासाठी निवेदने व प्रत्यक्ष पाठवपूरावा सुरु आहे.
मागील डिसेंबर २०२३ मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफ) संघटनेकडून निवेदन दिल्यानंतर त्यांनी विधानसभेत बस स्थानक बांधणीचा हा मुद्दा मांडल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली होती परंतु निधी अभावी अजून ही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने आज सोमवार दि.२२ जुलै रोजी पुर्णा बसस्थानक या ठिकाणी आंदोलन केले प्रशासनाने या आंदोलनास गांभीर्याने न घेतल्यास या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेने दिला आहे.
आंदोलनात संघटनेचे जिल्हा सचिव नसीर शेख, तालुकाध्यक्ष सचिन नरनवरे, तालुका कमिटी सदस्य प्रबुद्ध काळे, सुबोध खंदारे, वैभव जाधव, निरंजन खंदारे, शुभम गायकवाड, दुर्गेश वाघमारे, शेख सलीम याशिवाय व्यापारी वर्गातून अब्बास खान, शेख सादिक, शेख साद, युनूस भाई, सोमनाथ खरात आदींसह अनेक प्रवाशी सुद्धा सहभागी होते......
0 टिप्पण्या