🌟जखमी मोराच्या मदत व उपचारासाठी रेल्वे सेनेची टिम तात्काळ पोहोचली घटनास्थळी🌟
🌟लासूर स्टेशनचे सरपंच सौ.मिनाताई पांडव व त्यांचे पती संजय पांडवही धावले मदतीला🌟
छत्रपती संभाजीनगर :- निजामबाद-पुणे पॅसेंजर या धावत्या रेल्वे गाडीला आज बुधवार दि.१७ जुलै रोजी सकाळी ०८.३० ते ०८.४५ दरम्यान धडकून राष्ट्रीय पक्षी असलेला मोर गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी रेल्वे सेना टीमसह लासूर स्टेशनच्या सरपंच मिनाताई पांडव सह पती संजय पांडव यांना घटनास्थळी जाऊन जखमी मोराच्या उपचारकामी मदत करण्याची विनंती केली संबंधित मान्यवरांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी मोराच्या उपचाराला सुरुवात केली.
या घटने संदर्भात वन विभागाशी तात्काळ संपर्क देखील साधण्यात आल्याचे समजते यावेळी सरपंच सौ मीनाताई पांडव त्यांचे पती संजय पांडव रेल्वे सेना टीमचे मनीष मुथा,देवा सोनवणे,स्टेशन व्यवस्थापक विजय लहीरे,वन विभागाचे अधिकारी श्री चोघे,अशोक गवळी कर्मचारी,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.गोविद खताळ,सोपान बोरकर गावकरी छोटू पठाण, अरुण जाधव, तोषिफ कुरेशी, रवी खाजेकर,दिपक गायकवाड,वसीम शेख,शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने हजर झाले......
0 टिप्पण्या