🌟शिबीर निशुल्क असल्यामुळे नवोदितांसह सर्व खेळाडूंनी शिबिराचा लाभ घ्यावा - जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे
परभणी : जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत खो-खो या खेळांचे प्रशिक्षण शिबीर श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे दि. 22 ते 31 जुलै 2024 या कालावधीत सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिरात खो-खो खेळासाठी संजय मुंढे, राज्य क्रीडा मार्गदर्शक (9422178009) अनिल नलावडे (9764106985) रणजीत जाधव (9890821823) हे मार्गदर्शन करणार आहेत शिबीर निशुल्क असल्यामुळे नवोदितांसह सर्व खेळाडूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या