🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभाग गतीशक्ती व अमृत योजनेद्वारे तत्पर सेवा देईल - खा.डॉ.अजित गोपछडे


🌟 नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयात आयोजित बैठकीत बोलताना ते म्हणाले🌟

नांदेड :- दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग पी.एम.गतीशक्ती अमृत स्टेशन योजनेद्वारे अनेक पायाभूत सुविधा निर्माण करित आहे. यामुळे पुढील कालावधित नांदेड रेल्वे विभाग मराठवाड्यातील प्रवाश्यांना तत्पर सेवा देईल असा विश्वास खा.डॉ.अजित गोपछडे यांनी व्यक्त केला.

आज सकाळी 10 वाजता नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वे विकास कार्यास गती देण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि रेल्वे संदर्भातील अभ्यासक यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. प्रारंभी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक श्रीमती नीती सरकार यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे नांदेड विभागीय रेल्वे ची व्याप्ती, पूर्वस्थिती, आगामी योजना यांचे विवेचन केले.

अनेक समस्यांचे निराकरण जलद गतीने करण्यासाठी लोकसहभाग, प्रवासी जाग्रती इ. अभिनव कृती द्वारे कार्य करणे शक्य होईल. असा विचार व्यक्त करण्यात आला. प्रवासा दरम्यान समस्यांचे निराकरण, रेल्वेकोच, तंबाखूमुक्त प्लास्टिक मुक्त "ग्रीन रेल्वे स्टेशन" संकल्पना, आजुबाजुचा परिसर, दोन्ही प्रवेशद्वार शेजारी, सिटी बसस्टैंड, या सर्व ठिकाणी स्वच्छता करुन नांदेड मध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांना प्रसन्न वाटले पाहिजे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ कोणतीही बस  थांबू नये. सिटी बसस्थानकात थांबावी, जेणेकरून रहदारीस अडथळा होणार नाही. याठिकाणी रस्ता खुप अरुंद आहे. या सर्व बाबी साठी जिल्हा प्रशासन, मनपा, एस. टी. महामंडळ आणि रेल्वे यांची समन्वय समिती करुन त्रैमासिक आढावा घेऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. धावत्या रेल्वे मध्ये आजारी प्रवाशांची काळजी, गुणवत्तायुक्त अन्नपदार्थ उपलब्ध असणे, तंबाखूमुक्त रेल्वे, ज्यामुळे आपोआप स्वच्छता राहिल आरोग्य जाग्रती होईल.

वंदेभारत सारख्या वेगवान रेल्वे नांदेड ते नागपूर, हैद्राबाद, शिर्डी, पुणे दरम्यान सुरु करावी. नांदेड ते तिरुपती दैनंदिन पुष्करिणी एक्स्प्रेस सुरु करावी, संत्रागाछी साप्ताहिक एक्स्प्रेस पुढे आसाम मध्ये धुबरीसाहिब आणि तिनसुकिया पर्यंत वाढवावी ज्यामुळे सैन्य दलातील जवान आणि सिख यात्री थेट यात्रा करुन पटनासाहिब मार्गे पंजाब कडे जाऊ शकतील. इ. विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. त्रैमासिक आढावा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.

याप्रसंगी मराठवाडा रेल्वे समितीचे श्री शंतनू डोईफोडे, उमाकांत जोशी, गुरुद्वारा बोर्डाचे पूर्व सदस्य शिक्षण सभापती अॅड. अमरिक सिंघ वासरीकर, डॉक्टर्स आघाडी चे डॉ. सचिन उमरेकर, व्यापारी असोसिएशन चे दीपक कोठारी, जलतज्ज्ञ एच. एम. संगनोर, यांचे सह रेल्वे विभागीय कार्यालयातील सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या