🌟परभणी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेशासाठी दि.28 जुलै पासून दुसरी प्रवेश फेरीस सुरुवात.....!


🌟अशी माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विकास आडे यांनी दिली🌟

परभणी (दि.26 जुलै 2024) : परभणी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुसर्‍या प्रवेश फेरीस सोमवार दि.28 जुलै 2024 पासून सुरुवात होत आहे अशी माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विकास आडे यांनी दिली.

              शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे यात दि.28 जुलै 2024 पासून दुसर्‍या फेरीस सुरुवात होत आहे. आयटीआयच्या 23 ट्रेड साठी 840 जागा उपलब्ध असून विविध ट्रेडला विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्याने दुसर्‍या फेरीसाठी प्रत्यक्ष आयटीआयमध्ये उपस्थित राहून आपला प्रवेश निश्‍चित करावा, प्रवेश निश्‍चित करताना मूळ कागदपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो व प्रवेश शुल्क सोबत आणावे, रीतसर विविध ट्रेडसाठी ऑनलाईन पद्धतीने व मेरिट नुसार व गुणवत्ता नुसार विद्यार्थ्यांची निवड होत असते गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.  ऑनलाईन प्रवेश अर्ज भरलेल्या व दुसर्‍या फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी विकल्प एक ते तीन सादर केलेल्या व निवड झालेल्या उमेदवारांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा पुढील दोन फेरीसाठी उमेदवार अपात्र राहील, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्राचार्य आडे यांनी केले आहे.

             दरम्यान, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये आयटीआय मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना प्रवेश प्रक्रिये बाबत माहिती देण्यासाठी मार्गदर्शन करण्याची स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रवेशास काही अडचणी असल्यास प्रवेश मार्गदर्शन कक्षाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्‍चित करायचा आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये करिता व अधिक माहितीसाठी www.admisssion.dvet.gov.in  संकेतस्थळाचा उपयोग करून प्रवेशाबद्दल माहिती घेता येते. दुसर्‍या प्रवेश फेरी करिता  प्राचार्य विकास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रमुख गोपाळ घायाळ, सुनिल भोसले, जिल्हा समन्वयक एस. जी. भातलवंडे, काचगुंडे, डहाळे, जाधव, आंबीलवादे, मारोती रेनेवाड, टिपरसे, कोकणी, अभय श्रेष्ठ, सावळगे, प्रकाश मांजरमकर, गिरीश केदार, शेवाळे, भारतीबाई भराडे यांच्यासह तसेच प्रसिद्धीप्रमुख प्रकाश बनाटे आदी परिश्रम घेत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या