🌟त्याचप्रमाणे त्रिरत्न वंदना,परित्राणपाठ,धम्मदेसना,उपोसथ विधी आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन🌟
चिखली :- नागसेन सांस्कृतिक व क्रीडा समिती चिखली द्वारा संचालित नागसेन बुद्ध विहार येथे नेहमी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आषाढ महिन्यापासून पवित्र वर्षावास सुरुवात होत असते त्याच अनुषंगाने या कालावधी मध्ये दि २१ जुलै २०२४, आषाढ पौर्णिमेपासून नागसेन बुद्ध विहार जाफराबाद रोड राजे संभाजीनगर चिखली येथे पुज्य भदंत दिपंकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन ग्रंथाचे वाचन होणार आहे.
सविस्तर असे की जगात गुरुपौर्णिमा अर्थात आषाढी पौर्णिमा आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान पेरले. याच दिवसापासून बुद्ध धम्मातील पवित्र तीन महिन्यांच्या वर्षावासाला सुरवात होते आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या काळात जगातील प्रत्येक बुद्धविहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन करण्यात येते. त्याचप्रमाणे त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ, धम्मदेसना, उपोसथ विधी आदी धार्मिक कार्यक्रम केले जातात.
अशा या पवित्र वर्षावास कालावधी मध्ये २१ जुलै २०२४, आषाढ पौर्णिमेपासून नागसेन सांस्कृतिक व क्रीडा समिती चिखली द्वारा संचालित नागसेन बुद्ध विहार येथे पुज्य भदंत दिपंकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन ग्रंथाचे वाचन रात्री ०८ ते ०९ या वेळेत होणार आहे. तरी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहुन ग्रंथ श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव मोरे, बी.बी. साळवे, एस.एस. मघाडे, टी.एस. खरात, बी.बी. गवई, आर.एस. जाधव, एस.पी.विणकर, व्ही.के. डोंगरदिवे, संगीताताई लहाने यांनी केले आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या