🌟शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष🌟
🌟 तुपकरांनी आज 24 जुलै पुण्यात बोलाविली बैठक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा : जाहीर करणार भूमिका🌟
✍️ मोहन चौकेकर
बुलढाणा - संपूर्ण राज्यभरातील शेतकरी चळवळीतील प्रमुख नेते, पदाधिकारी व युवा कार्यकर्ते आज २४ जुलै रोजी पुण्यात पोहोचणार आहेत. शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात येथे महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत चळवळीची पुढील दिशा व राजकीय भूमिका यावर विचारमंथन होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काल शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले रविकांत तुपकरांना बडतर्फ केल्यानंतर ते आज पुण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या बैठकीत ते काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे नाव संपूर्ण राज्याला परिचित आहे. शेतकरी चळवळीचा युवा चेहरा आणि आक्रमक नेतृत्व म्हणून रविकांत तुपकरांची ओळख आहे. राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली आहे. चळवळीतील नव्या जुन्या सर्व प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांना त्यांनी आता एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने शेतकरी चळवळीतील पुढील आंदोलनात्मक व राजकीय दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी चळवळीतील प्रमुख महत्वाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक २४ जुलै रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. एस. एम. जोशी फाऊंडेशन सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत सर्वांसोबत विचार मंथन व चर्चा करून शेतकरी चळवळीची पुढील आंदोलनात्मक तसेच राजकीय दिशा ठरविली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून एकट्याच्या बळावर तब्बल अडीच लाख मते घेत संपूर्ण राज्यातील सगळ्याच प्रमुख पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नुकतीच काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी या बैठकीत केली होती. संपूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणूक लढवायची,असा निर्धार करून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात पुणे येथे राज्यस्तरीय बैठक होऊ घातली आहे. परंतू त्याआधीच स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बडतर्फ केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर कोणती भूमिका घेतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येच राहुन दुसरा गट निर्माण करतात कि एखाद्या नवीन पक्षाची घोषणा करुन एखादी नवीन राजकीय आघाडी उभी करणात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने देखील त्यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या बैठकीत शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आता नेमकी आंदोलनाची घोषणा करतात की विधानसभेच्या दृष्टिकोनातून राज्यपातळीवर वेगळी राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसोबतच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते देखील याकडे लक्ष ठेवून आहेत हे विशेष..!
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या