🌟बैठकीस पूर्णा तालुका निरीक्षक माझी महापौर रवी सोनकांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
पुर्णा :- राज्यातील आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकी संदर्भात पुर्णा तालुका काँग्रेसची आढावा बैठक महाविर नगर परिसरातील मानव कम्प्युटर सेंटर येथे संपन्न झाली बैठकीस पूर्णा तालुका निरीक्षक माझी महापौर रवी सोनकांबळे यांनी नवीन मतदान नोंदणी,बूथ कमिट्या आदी संदर्भात आढावा घेतला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथ भोसले माजी तर प्रमुख पाहुणे म्हणून रवी सोनकांबळे,पुर्णा तालुका काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे शहराध्यक्ष शेख अहमद,माजी उपनगराध्यक्ष सलीम महमद साहब,मा.तालुकाध्यक्ष हमुंमत डाके जिल्हा उपाध्यक्ष शिवसंभ देशुमुख,निखिल धामनगावे जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया,प्रल्हाद पारवे तालुकाध्यक्ष शेख अहेमद रफिक सर,अमोल डाखोरे, दुधमाल,नसरुल्लखन, हर्षवर्धन गायकवाड,राजू गायकवाड, उदंअसे अनेक कार्य कार्यकर्ते उपस्थित होते.....
0 टिप्पण्या