🌟तर काही गाड्यांचे मार्गसुध्दा बदलले आहेत🌟
नांदेड (दि.25 जुलै 2024) :- मध्य रेल्वे अंतर्गत दोन रेल्वेस्थानकावर ट्राफिक आणि ईलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग ब्लॉक घेण्यात आला असून या कामामुळे रेल्वे विभागाने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही गाड्यांचे मार्गसुध्दा बदलले आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 8 एक्सप्रेसचा समावेश आहे. विशेषतः 17614 नांदेड-पनवेल एक्सप्रेस 28 ते 31 जूलै दरम्यान तर 17613 पनवेल-नांदेड एक्सप्रेस 29 जूलै ते 1 आगस्ट, 11409 दौंड-निझामाबाद एक्सप्रेस 29 जूलै ते 1 ऑगस्ट, 11410 निझामाबाद-पुणे एक्सप्रेस 31 जूलै ते 3 ऑगस्ट, 17630 नांदेड-पुणे एक्सप्रेस 31 जूलै रोजी, 17629 पुणे-नांदेड एक्सप्रेस 1 ऑगस्ट रोजी, 01413 निझामाबाद-पंढरपूर एक्सप्रेस 1 व 2 ऑगस्ट व 01414 पंढरपूर-निझामाबाद एक्सप्रेस 2 व 3 ऑगस्ट रोजी धावणार नाहीत.
तर 11410 निझामाबाद-पुणे ही एक्सप्रेस 28 ते 30 जूलै दरम्यान दौंड कोर्ड लाईन मार्गे धावणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क कार्यालयाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली......
0 टिप्पण्या