🌟मुंबईतील इंदुमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक तात्काळ उभारण्यासाठी परभणीत प्राणांतिक आमरण उपोषण.....!


🌟उपोषणास ऑल इंडिया पँथर सेनेचा पाठींबा🌟

परभणी : मुंबईतील इंदुमिल मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी परभणीत सुरु असलेल्या प्राणांतिक आमरण उपोषणास ऑल इंडिया पँथर सेनेने पाठींबा दिला आहे.

              दलित चळवळीचे नेते अर्जून पंडीत व विश्‍वजित वाघमारे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक आमरण उपोषण सुरु केले आहे आज शनिवार दि.२७ जुलै रोजी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेवून संवाद साधला व आंदोलनास पाठींबा दर्शविला दरम्यान राज्य सरकारने दलित बांधवांशी दिशाभूल करणे थांबवावे व लवकरात लवकर या राष्ट्रीय स्मारकाचे काम पूर्ण करावे अशी अपेक्षा दिपक केदार यांनी यावेळी व्यक्त केली........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या