🌟सिद्धार्थ खरात मानवतेचा स्पर्श लाभलेल बहुआयामी व्यक्तिमत्व....!


🌟मंत्रालयातील गृह विभागातून सहसचिव पदावरून तिन दशकाच्या निष्कलंक सेवेतून सिद्धार्थ खरात सेवानिवृत्त🌟 

मंत्रालयातील गृह विभागातून सहसचिव पदावरून तिन दशकाच्या निष्कलंक सेवेतून दिनांक एक जुलै 2024 रोजी स्वेच्छा निवृत्ती घेतलेले सिद्धार्थ खरात यांचं समस्त जीवन आणि कार्य मानव जातीसमोर प्रेरणादायी स्फूर्तीदायक व दिशादर्शक अशा स्वरूपाच आहे.बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यामध्ये अतिदुर्ग म ताड शिवनी या डोंगरा ळ खेड्यामध्ये त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबामध्ये झाला वडील रामभाऊ खरात खरात कमालीचे नीतिमान महामानव  भगवान बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराचा व कार्याचा प्रचंड प्रभाव असणारे तत्कालीन रिपब्लिकन पक्षाचे पुढारी नागोराव जाधव गुरुजी यांच्यासोबत समाज प्रबोधनाच्या कामामध्ये सक्रिय असणारे आई रेशमबाई यांचं माहेर ताड शिवणीला लागूनच सोनोशी हे माळ रानाच्या कुशीत वसलेलं छोट गाव. रेश म आई यांचे वडील बंधू यांच्या वर संताचा प्रभाव.न चुकता दरवर्षी आषाढी पौर्णिमेला पंढरपूरची वारी करणारे.

त्यांचे ज्येष्ठ बंधू दत्तू शिंदे माळकरी व्यसनापासून व मांसाहारापासून अगदी बालवयापासून दूर असलेले असे होते लहान बंधू हरीभाऊ प्रखर  बुद्धिमानी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती कारी विचाराचा प्रभाव असलेले प्रथित यश कवी होते. त्यांनी अतिशय हालखीच्या परिस्थितीमध्ये मध्ये एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेऊन एम एस ई बी मध्ये वरिष्ठ पदावर सेवेमध्ये होते. अशा प्रकारच्या सामाजिक धार्मिक संत परंपरा लाभलेल्या वैभवशाली कुटुंबा मधून सिद्धार्थ खरात यांच्या जीवनाची जडणघडण झाली. विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य संदेश शिका संघटित व्हा संघर्ष करा डोळ्यासमोर ठेवून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या पूज्य माता रेशम आई विदर्भाच्या बहिणाबाई म्हणून उभ्या महाराष्ट्राला सुपरीचीत.

त्यांच्या जात्यावरील ओव्या संतावरील अभंग महामानव भगवान बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील त्यांची गे य स्वरूपाची गीत रचना सुमधुर आवाजामध्ये श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारी होती पूज्यपिता रामभाऊ सामाजिक धार्मिक कार्यामध्ये आवड असणारे आपल्या मुला मुलींनी दर्जेदार उच्च प्रकारचे शिक्षण घ्यावं यासाठी आग्रही असणारे होते अशा थोर माता-पित्यांच्या संस्कारामधून सिद्धार्थ खरात आणि त्यांचे बंधू यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षन गुणवत्तेमध्ये पूर्ण केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संभाजीनगर या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मिलिंद महाविद्यालय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय स्थापन केलेले. 

या ठिकाणी आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं ही त्यांची मनोमन इच्छा परिस्थिती हलाखीचे असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलांना संभाजीनगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी पाठवल संधीचं सोनं कसं करावं हे सिद्धार्थ खरात यांच्याकडून शिकण्यासारखे आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागसेनवन या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयातील अभ्यासाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते हिरीरीने न भाग घेऊ लागले. गीत गायन स्पर्धा वकृत्वस्पर्धा यामध्ये राज्य पातळीवरचे विविध बक्षिसे प्राप्त केले. 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आयोजित अतिशय प्रतिष्ठेची 'जय भीम वादविवाद स्पर्धा"या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक त्यांनी पटकावलं सहाजिकच महाविद्यालयामध्ये नागसेन वन परिसरामध्ये त्यांच्याकडे एक बुद्धिमान जिज्ञासू वाद विवादा मध्ये निपुण विद्यार्थी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन झाला या महाविद्यालय मधून त्यांनी बीकॉम ची पदवी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण करून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयांमध्ये एम.ए केले एम.ए प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण करून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होण्याची त्यांची इच्छा परंतु एम ए ला त्यांना क्लास मिळाला नाही आणि प्राध्यापक बनण्याचं त्यांचं स्वप्न अधुर राहिलं या कालखंडामध्ये त्यांची मनस्थिती द्विधा अवस्थेमध्ये होते. 

दैनिक लोकमत मध्ये त्याने काही काळ ट्रान्सलेटरचं काम सुद्धा केले नंतर त्यांनी मनाचा ठाम निश्चय केला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व्हायचं त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उप निरीक्षक मंत्रालयातील कक्ष अधिकारी परीक्षा दिली प्रचंड मेहनत जिद्द व चिकाटीच्या जोरावर या परीक्षेमध्ये त्यांना सुयश मिळाल त्यांचा मागासवर्ग प्रवर्ग असताना सुद्धा अ मागासवर्गीयामध्ये ते गुणाानुक्रमे प्रथम आले पहिली ऑर्डर त्यांना पोलीस उपनिरीक्षकाची मिळाली.नाशिक या ठिकाणी त्यांनी पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण करत असताना त्यांना मंत्रालयामधील कक्ष अधिकारी पदाची ऑर्डर आली या मधल्या कालावधीमध्ये ते माझ्याकडे परभणी जिल्ह्यातील धनगर टाकळी या गावी आले होते. आम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये जवळचे मित्र आणि नातेवाईक मावस भाऊ त्या ठिकाणी मी राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगरी टाकळी जी परभणी या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होतो. 

त्यांनी मला सांगितले श्रीकांत जी माझा पिंड हा पोलीस खात्याचा नाही मला मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी पदावर काम करायला आवडेल या माध्यमातून आपण समाजाची खूप चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो त्यांच्या अंतर्मनाने ठरवलं आणि ते कक्ष अधिकारी पदी मुंबई या ठिकाणी मंत्रालयामध्ये जॉईन झाले जननी आणि जन्मभूमी श्रेष्ठ असते आपल्या गावाच्या प्रति आपल्या जिल्ह्याच्या प्रति आपण काहीतरी जनकल्याणकारी काम केलं पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी उत्कर्ष फाउंडेशनची स्थापना केली समाजातील निरक्षर व शिक्षित तरुणाईला उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सन्मार्गावर आणले. दूध डेयरी, कृषी उद्योगावर आधारित उद्योग व्यवसाय मार्गदर्शन आदीच्या माध्यमातून तरुणाईला उद्योग धंद्याला लावले अनेक सन्माननीय मंत्री महोदयाचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. 

सन्माननीय माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे सन्माननीय माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय नितीन राऊत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून अतिशय बहुमोलाचे कार्य केले कक्ष अधिकारी ते गृह विभागाचे सहसचिव अशा प्रकारचा त्यांच्या सेवेचा चढता आलेख राहिला एक चरित्र संपन्न बेदाग उच्चपदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी सेवा केली उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने प्रकाशन समितीवर ते असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बरेचसे अप्रकाशित साहित्य प्रकाशित झाले आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक अविनाश डोळस सर चरित्र साधने समितीचे सदस्य सचिव आणि सिद्धार्थ जी खरात यांची केमिस्ट्री खूप जुळत असे दोघेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर भरभरून बोलत असत.

आदरणीय प्राध्यापक अविनाश डोळस सर यांच्या अकाली निधनानंतर सिद्धार्थ खरात यांना अतिव दुःख झाले. असं म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे एक स्त्री असते मग ती आई असेल पत्नी असेल त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आई इतकच महत्त्व त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर सुवर्णाताई खरात ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन्माननीय सचिव आहेत त्यांचाही प्रवास अशाच प्रकारचा आहे मंत्रालयातील कक्ष अधिकारी ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव अशा स्वरूपाचा त्यांनी ही मंत्रालयामध्ये विविध उच्चपदस्थ पदे अतिशय जबाबदारीने सांभाळून त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः त्यांनी मंत्रालयातील कामाची जबाबदारी सांभाळून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामधून पीएचडी सुद्धा प्राप्त केली मेड फॉर इच अदर अशा प्रकारची ही जोडी समाजाला भूषण वाटावं अशा स्वरूपाची आहे दोघांच्याही दिव्यदृष्टीतून संकल्पनेतून उत्कर्ष महाविद्यालय सिंदखेड राजा ची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. 

आंबेडकर नायक पुरस्काराच्या माध्यमातून समाजातील होतकरू गुणी विद्यार्थी विद्यार्थिनीचा सन्मान केला आदरणीय सिद्धार्थ खरात आणि डॉ. सुवर्णाताई यांच्या जीवनवेलीवर दोन सुंदर अशी फुलं उमलली आहे त. सुकन्या डॉ. सांची ह्यांनी वैद्यकीय क्षेत्रामधील सर्वोच्च पदवी एम .बी.बी. एस. एम. डी. प्राविण्‍यामध्ये उत्तीर्ण केली सुपुत्र सार्थ सुद्धा उच्च व दर्जेदार शिक्षण घेत आहे सिद्धार्थ खरात यांच्या सेवापूर्तीचा गौरव सोहळा अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये बुलढाणा या ठिकाणी दिनांक 27 जुलै 2024 या दिवशी संपन्न होत आहे. सहकार क्षेत्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या नावाचा एक वेगळा इतिहास निर्माण केला असे आदर्श व्यक्तिमत्व बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक आदरणीय राधेश्यामजी चांडक यांच्या अध्यक्षतेखाली व युगपुरुष मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी व इतर गणमान्य माननीय व्यक्तिमत्त्वाच्या उपस्थितीमध्ये सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न होत आहे. 

अतिशय प्रेरणादायी अशा स्वरूपाचा हा सोहळा असणार आहे कारण बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये यापुढे सिद्धार्थ खरात स्वतःला वाहून घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यांच्या सेवागौरव सोहळ्याला हार्दिक शुभेच्छा मंगल कामना...!

शुभेच्छुक श्रीकांत हिवाळे सर 

मा. तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जि. परभणी.

 मो.न.9545082301

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या