🌟अमोलजी पाटणकर यांनी ऊत्कृष्ट खेळाडू अजित बुरे व महेश ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार🌟
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर येथील स्थानिक जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचे खेळाडू शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अजित मनोहर भुरे व महेश सुरेशराव ठाकरे या खेळाडूंच्या सत्कार ऊपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांचे स्विय सहाय्यक अमोल पाटणकर यांच्या हस्ते एका कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला.
राज्यस्तरीय स्पर्धेत वाशिम जिल्हा आट्या पाट्या असोसिएशनला व जय गजानन महाराज क्रीडा मंडळ मागील चारते पाच वर्षा पासुन अजित बुरे,महेश ठाकरे,सागर गुल्हाने यांनी अनेक पदक मिळून दिले.त्या प्रमाणे राष्ट्रीय खेळांमध्ये सुध्दा अजित भुरे याने उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र संघाला अनेकदा सुवर्णपदक व कांस्यपदक मिळून दिले आहे. काही स्पर्धेमध्ये तर या खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला आॅल इंडिया बेस्ट प्लेयर सुद्धा मिळवून दिले आहे याच बरोबरीने महेश ठाकरे यांनी सुध्दा अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेले आहेत यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑल इंडिया बेस्ट प्लेअरच्या पुरस्कार मिळालेले आहे. यानिमित्ताने दि.२० जुलै रोजी शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.यावेळी देवराव फुके,निलेश तुळजापुरे,श्रीरंग पाटील,सतीश हिवरकर, राम नंदनकर, सुमित मुंडे,सुजित देशमुख,आकाश चौधरी,मयूर पाटील, श्रीकांत इंगोले तथा यंग सिटीजन फोरमचे सदस्य उपस्थित होते.....
0 टिप्पण्या