🌟कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे यांनी केली ग्रंथालय व अभ्यासिकेची पाहणी....!


🌟यावेळी श्री.हेलोंडे यांनी ई लायब्ररी,ग्रंथालय अभ्यासिकेच्या सुरू असलेल्या नवीन बांधकामाची पाहणी सुध्दा केली🌟 


फुलचंद भगत

वाशिम :- कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे (राज्यमंत्री दर्जा) हे दि.१२ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर आले असताना  राजस्थान आर्य कला महाविद्यालयात ग्रंथालयाची व अभ्यासिकेची पाहणी केली. यावेळी तहसीलदार निलेश पळसकर,राजस्थान आर्य महाविद्यालयाचे माजी अध्यक्षा तथा संचालिका  शिलाताई राठी , प्राचार्य ओमप्रकाश झंवर, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सागर सोनी आदींची प्रमुख उपस्थिती होती.


       यावेळी श्री.हेलोंडे यांनी ई लायब्ररी, ग्रंथालय अभ्यासिकेच्या सुरू असलेल्या नवीन बांधकामाची पाहणी सुध्दा केली. अभ्यासिकेत मागासवर्गीय मुलांना मोफत सेवा उपलब्ध करून देण्याच्या सुचना  संचालक मंडळाला दिल्या.पाहणी दरम्यान ग्रंथालयात  उपलब्ध पुस्तकांची पाहणी केली.  उपलब्ध नसलेली स्पर्धा परिक्षेची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. मला पुस्तकांचे वाचन करायला आवडते. पुस्तके उपलब्ध असतील तर येथे शिकत असलेली विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांचे वाचन करुन शकतील. ग्रंथालयात जवळपास ४९ हजार पुस्तकं उपलब्ध असल्याचे प्राचार्य श्री.झंवर यांनी सांगितले.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी विशेष बाब म्हणून स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तकांची पुर्तता करण्याच्या सुचना श्री.हेलोंडे यांनी केल्या श्रीमती राठी यांनी ई- लर्निंग अभ्यासीकेची माहिती दिली.

   यावेळी प्रा.डॉ. विपीन राठोड, डॉ. विजय जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या