🌟चुडावा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद : परिसरात व्यक्त होतेय हळहळ🌟
पुर्णा (दि.१९ जुलै २०२४) : पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील एका २८ वर्षीय मातेने आपल्या अवघ्या ०२ वर्षाच्या मुलीसह गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयविदारक घटना काल गुरूवार दि.१८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ०५.४५ वाजेच्या सुमारास घडली या घटने संदर्भात या चुडावा पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव द्रौपदी इंद्रजित देसाई वय २८ वर्ष तर मुलीचे नाव आळंदी इंद्रजित देसाई वय ०२ वर्ष असे आहे मयत द्रौपदी हिने सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत स्वत:च्या चिमुकलीसह छताच्या कडीला दोरी बांधून गळफास लावून आपले जीवन संपवले आत्महत्येचे मुळ कारण अद्याप कळू शकलेले नाही मृत महिलेचा भाऊ बाबाराव विठ्ठलराव लोखंडे मूळ राहणार सातेफळ वाघ हल्ली मुक्काम चुडावा यांनी फिर्याद दिली आहे चुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर,पोलिस उपनिरीक्षक बळीराम राठोड यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मित मृत्युची नोंद केली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बळीराम राठोड करीत आहेत......
0 टिप्पण्या