🌟पुर्णा शहरात दाजीसाहेब कदम प्रतिष्ठानच्या वतीने विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी महोत्सव उत्सव संपन्न....!


🌟शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण : आषाढी एकादशी निमित्त आयोजित पाखली सोहळ्यास प्रचंड प्रतिसाद🌟


 पुर्णा (दि.१७ जुलै २०२४) : पुर्णा शहरात प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य सैनिक कै.दाजीसाहेब  कदम पाटील प्रतिष्ठाणच्या वतीने आज बुधवार दि.१७ जुलै २०२४ रोजी सकाळच्या सुमारास ‘आषाढी महोत्सवासह पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वारकरी संप्रदायासह हजारो विठ्ठल भक्तांनी या आषाढी महोत्सव सोहळ्यात सहभाग नोंदवला संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित विठ्ठलभक्तांनी विठ्ठल नामाचा गजर केला त्यामुळे संपूर्ण शहराला अक्षरशः प्रती पंढरपूर नगरीचे स्वरूप आले होते.

       पुर्णा शहरात प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील आषाढी महोत्सवाच्या दिंडीस कृषी उत्पन्न बाजार समिती (नवा मोंढा) येथून सुरुवात झाली शहरातील आनंद नगर चौक,महात्मा बसवेश्‍वर चौक, भगतसिंह चौक, महादेव मंदिर, श्रीगुरु बुध्दीस्वामी मठ, दत्त मंदिर, संत नरहरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक मार्गे या दिंडीचा जूना मोंढ्यातील श्रीराम मंदिरात समारोप झाला. तत्पूर्वी जूना मोंढ्यातील मैदानावर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पारंपारिक गोल रिंगणचा सोहळा रंगला.

                तत्पूर्वी ‘रामकृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली’ व ‘विठू नामाचा गजर’ करीत पालखी निघाली. टाळमृदंगाच्या आवाजाने जणू पंढरीत असल्याचा भास पूर्णेकरांना होत होता. लहान थोर हरिनामात तल्लीन झाले होते तर माऊलीच्या रिंगणाची अनुभुती पूर्णेकरांनी अनुभवली. आनंदनगर चौक येथे किलबिल बाल संस्कार शाळेच्या चिमुकल्यांनी वारकर्‍यांची वेशभूषा धारण करून पालखीचे स्वागत केले. शहाणे कुटुंबियांच्या वतीने पालखीतील सहभागी भाविकांना फळ वाटप केले. दिंडीत  महिला व पुरुष भजनी मंडळे, लेझीम पथके आदींचा  सहभाग होता.

              जुना मोंढा मैदानात पारंपरिक असे भव्य गोल रिंगनाचे आयोजन केले होते. रिंगणात पळणार्‍या घोड्याला पाहून वारीतील रिंगणाचा अनुभव आला. या वेळी पाखीचे संयोजक विशाल कदम यांनी सपत्नीक फुगडी खेळली तर उप विभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनीही फुगडी खेळली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली..........

अन् चिमुकलीने देखील केली आषाढी एकादशीला विठुरायाची मनोभावे पुजा....


आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत असतांना मग ही चिमुकली कशी मागे राहिल...पुर्णेतील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक साहित्यिक कलावंत तथा जेष्ठ पत्रकार आदरणीय जगदीश जोगदंड सर यांची नात काश्वी प्रतिकराजे भोसले ही चिमुकली पंढरीच्या पांडुरंगाची अत्यंत मनोभावे पुजा करतांना....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या