🌟मंगरुळपीर येथील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना आरटीओचीही भिंती राहीली नाही🌟
🌟आरटीओ आणी पोलिसांच्या नाकावर टिच्चुन नियमबाह्य विद्यार्थी वाहतुक🌟
फुलचंद भगत
वाशिम :- वाशिम जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस.या शासकीय कामासाठी जात असतांना मंगरुळपीर शहरातुन विद्यार्थांची प्रवाशी वाहतुक बेकायदेशीररित्या सुरु असल्याचे दिसले.क्षमतेपेक्षा जास्त आॅटोमध्ये विद्यार्थ्यांना कोंबुन बसवले होते तसेच विद्यार्थ्यांचे दप्तरेही बाहेर लटकवलेले होते.अशा पध्दतीच्या वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतु शकते त्यामुळे तात्काळ सदर आॅटोचालकांना ताब्यात घेवुन कारवाईसाठी मंगरुळपीर पो.स्टे.ला सुचित केले.येथील ठाणेदार यांनी कारवाई करत इतरही आॅटोचालकांची बैठक घेवुन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सर्वांना सुचना दिल्या.दि.२० जुलै रोजी मंगरुळपीर येथील प्रत्येक शाळेत पोलिस तैनात होते तर आरटिओ पथकही शहरात ठाण मांडुन बसले होते.असे असतांनाही जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची पायमल्ली करत व आरटिओ आणी पोलीस विभागाच्या नाकावर टिच्चुन अवैध आणी नियमबाह्य कटल्यामध्ये विद्यार्थ्यांना कोंबुन वाहतुक केल्याचे चिञ मंगरुळपीर येथे पाहावयास मिळाले आहे.विद्यार्थी आणी पालकांच्या हिताचेच प्रशासनाने नियम असुनही असे विद्यार्थ्यांना मरणाच्या दारात पालकांनी तरी ऊभे करु नये अशी माफक अपेक्षा सुज्ञ नागरीकांकडुन व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांची ने-आण करणार्या वाहनांतून विद्यार्थी संख्येची क्षमता महाराष्ट्र मोटार वाहन नियम 106 नुसार 12 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना 2 आसन क्षमता असणार्या सीटवर 3 विद्यार्थी व तीन आसन क्षमता असणार्या वाहनात चार विद्यार्थी इतकीच आहे. प्रत्यक्षात रिक्षात 12 ते 15 विद्यार्थी कोंबले जात आहेत. वर्षानुवर्षे ही वाहतूक कशी सुरू राहते, हा मोठा प्रश्न आहे.रिक्षाचालकांची मनमानी वाढत आहे, पण मुलांना शाळेत जाण्यासाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. मुलांच्या शाळेच्या वेळेत शहरबस उपलब्ध नसते. शिवाय वेळही निश्चित नसतो. मुलांना नाइलाजास्तव रिक्षानेच शाळेत जावे लागते.पण अशा वाहतुकीमुळे चिमुकल्यांच्या जिवावर बेतु शकते हे पालकांनी आणी आॅटोचालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.मंगरुळपीर शहरातील बिघडलेली वाहतुक व्यवस्था व नियमबाह्य होत असलेली विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने प्रशासनासह आरटिओ व पोलिस प्रशासनही आता अॅक्शन मोडवर आलेले आहे.पोलीसांनी आता शहरातुन गस्त वाढवली असुन शाळेवरही पोलिस तैनात केले आहे.आरटीओ चे 'वायुवेग' पथकही या विषयावर लक्ष ठेवुन असल्याने आता नियमबाह्य वाहतुकीला आळा बसण्याला मदत होत आहे.दि.२२ जुलै रोजी आरटिओ पथकाकडुन १२ वाहणे तपासली आणी त्यापैकी नियम मोडणार्या सहा वाहनांवर कारवाई करुन दंड आकारला आहे.पोलीसही अवैध प्रवाशी वाहतुक व क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतुक करणार्या आॅटोचालकांवर लक्ष ठेवुन आहेत.
*नियम पालनासाठी पालकांची साथ हवी :-
नियमानुसार वाहतूक झाली, तर प्रवासखर्चात महिन्याला 180 ते 200 रुपये वाढ होईल. त्यासाठी आपल्या मुलांच्या सुरक्षेबद्दल तडजोड करायची का ? पालकांनी नियम जाणून घेऊन ते लागू करण्यासाठी प्रशासनाला साथ द्यायला हवी.
*आरटिओ च्या 'वायुवेग' पथकाने मंगरुळपीर येथे ठिकठिकाणी केल्या कारवाया :-
दि.२२ जुलै रोजी वाशिम येथील आरटिओच्या 'वायुवेग पथकाने मंगरुळपीर येथे ठिकठिकाणी कारवाया करत वाहतुकीचे नियम मोडणारावर दंड आकारला आहे.१२ वाहनांची तपासणी करत त्यापैकी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणार्या सहा वाहनांवर कारवाई करुन दंड आकारला.मंगरुळपीर येथील बस स्टॅन्ड परिसरात नेमुन दिलेल्या आॅटो आणी टु व्हिलर पार्कींगमध्ये वाहने उभी न करता सर्रास बस स्टॅन्ड परिसरात एसटीसमोर वाहने आॅटोचालक नेतात.अशामुळे एखादा अपघात होण्याची संभावना नाकारता येत नाही.त्यामुळे अशा बेशिस्त टोचालकांवरही आरटिओ पथकांनी कारवाया केल्या.बस स्टॅन्डमधील बेशिस्त वाहतुकीला आळा बसण्यासाठी प्रशासनाकडुन कारवाया सुरु आहेत.
*वाहतुकीचे नियम मोडणारांची आता खैर नाही :-
यापुढे कुण्याही आॅटोचालकाने विशेषतः विद्यार्थी ने आन करणार्या वाहनाने वाहतुकीचे नियम मोडल्यास किंवा क्षमतेपेक्षा जास्त मुळे वाहनात बसवल्यास कठोर कारवाई होणार आहे.वाशिम जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थी वाहनांविषयी संवेदनशिलतेने घेवुन यापुढे गैर न करता नियम धाब्यावर बसवणार्या आॅटोचालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.दि.२० जुलै रोजी मंगरुळपीर येथील प्रत्येक शाळेत पोलीस तैनात करण्यात आले होते.आता विद्यार्थी वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.आरटिओ पथकही मंगरुळपीरमध्ये ठाण मांडुन आहे त्यामुळे नियम मोडणारांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.आॅटोचालकांनी कारवाई होईल या भितिने विद्यार्थी शाळेत नेले नसल्याने मुलांना शाळेत जाताच आले नाही.पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत ने आण करण्याची वेळ आली आहे.
*खेड्यातुन एसटी बस फेर्या सुरु करण्याची होत आहे मागणी :-
कमी विद्यार्थी संख्येवर आॅटो चालवणे परवडत नाही आणी क्षमतेपेक्षा जास्त मुले आॅटोत बसवल्यास पोलीस कारवाई करतात या भितीने आॅटोचालकांनी आॅटो बंद ठेवले असल्याने खेड्यापाड्यातुन शहरात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली असल्याने महामंडळने आपल्या बसफेर्या शाळेच्या वेळात सुरु कराव्यात अशी मागणी आता जोर धरत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या