🌟नांदेड सचखंड गुरुद्वाऱ्यातील अखंड पाठ घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या गुरुद्वारा बोर्ड प्रशासना विरोधात संताप....!


🌟बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्थानिक सिख संगतचा २५ जुलैपासून उपोषण व धरणे आंदोलनाचा इशारा🌟


नांदेड (दि.२० जुलै २०२४) :- नांदेड सचखंड गुरुद्वाऱ्यातील अखंड पाठ घोटाळ्यातील आरोपीतांना सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्रशासन सातत्याने पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे स्थानिक सिख संगत (समाज) मध्ये तिव्र संताप व्यक्त होत असून या अखंड पाठ घोटाळा प्रकरणी पुर्व प्रभारी गुरुद्वारा बोर्ड अधिक्षक ठाणसिंघ बुंगई यांच्यासह अन्य तीन आरोपींवर वजीराबाद पोलीस स्थानकात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३०/२०२५ चे कलम ४२०,४०६,३४ अंतर्गत दि.१५ जुलै २०२४ रोजी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आंदोलनासह साखळी उपोषण करण्याचा इशारा बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजुरी साध संगतच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की गुन्हा दाखल झालेल्या नमूद तारखेपासून आजपर्यंत सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने या घटनेतील आरोपींकडून अपहार केलेली रक्कम वसुल करण्याचे धाडस तर केलेच नाही याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे संबंधित अपहारकर्त्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यास देखील गुरुद्वारा बोर्ड प्रशासन असमर्थ असल्याने समाजात प्रचंड असंतोष पसरला असून संबंधित आरोपींना पाठीशी घालणाऱ्या गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाच्या निषेधार्थ गुरूवार दि.२५ जुलै २०२४ पासून गुरुद्वारा गेट नंबर ०१ समोर दर्शन देवडी येथे उपोषण व धरणे आंदोलनासह साखळी उपोषण करण्याचा इशारा बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजुरी साध संगतच्या वतीने निवेदनाद्वारे गुरूद्वारा बोर्डाचे अधीक्षक यांना देण्यात आला आहे.

बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजुरी साध संगतच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने अखंड पाठ घोटाळ्याच्या चौकशीसाठी विभागीय चौकशी अधिकारी यांच्याकडून चौकशी करून कर्मचारी दोषी असल्याचा अहवाल दि.२६ सप्टेंबर २०२० रोजी दिला या अहवालात संबंधित कर्मचाऱ्यांनी अखंड पाठात ३६ लाख ६९ हजार ३५० रुपयांचा अपहार आपसात मिळून केला व अखंड पाठचे ७२१ बनावट फॉर्म तयार करून घोटाळा केल्याचा आरोप चौकशीत सिद्ध झाल्याने प्रथम चौकशी अधिकारी श्रीमान सरदार गुरसागरसिंघजी सुखमणी यांनी आपल्या गुरुद्वारा बोर्डात चौकशी रिपोर्ट सादर केला होता. त्यानुसार दोषी असलेल्या चारही कर्मचारी यांच्या विरोधात दि.२४ जुलै २०२० रोजी निलंबनाची कार्यवाही तत्कालीन गुरुद्वारा बोर्ड चेअरमन यांनी केली होती तद्नंतर महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले नवीन चेअरमन परविंदरसिंघ पसरिचा यांनी नियमबाह्यरित्या दोषी कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर रुजू करण्याचे पाप दि.०९ जुलै २०२२ रोजी पवित्र धार्मिक संस्था असलेल्या गुरुद्वारा बोर्डामध्ये दोषी भ्रष्ट कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आले आहे परंतु दि.१५ जुलै २०२४ रोजी संबंधित दोषी कर्मचारी यांच्या विरोधात वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होऊनही सचखंड गुरुद्वारा बोर्ड कार्यालयाकडून निलंबित करण्याची कार्यवाही केली नसल्याने बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्थानिक सिख संगतच्या वतीने गुरुद्वारा बोर्ड कार्यालयासमोर धरणे व चक्री उपोषणाला सुरुवात करण्यात येणार असून सदरील धरणे करतांना प्रशासनाची बदनामी व काही घटना घडल्यास गुरुद्वारा बोर्ड प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजुरी साध संगतचे अध्यक्ष मनबीरसिंघ ग्रंथी, दिपकसिंघ गल्लीवाले, बिरेंद्रसिंघ बेदी, जगदीपसिंघ नंबरदार, जसबीरसिंघ बुंगई, जसपालसिंघ लांगरी,प्रेमजीतसिंघ शिलेदार, बक्षीसिंघ प्रजारी, सतनामसिंघ, हरदीपसिंघ, जसबीरसिंघ हुंदल, साहेबसिंघ  सुखमनी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या