🌟परभणीत उद्या गुरुवार दि.२५ जुलै रोजी येणार आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा.....!


🌟आमदार डॉ.राहुल पाटील यांचा पुढाकार : लहुजी नगरात होणार पुतळ्याची उभारणी🌟

परभणी (दि.२४ जुलै २०२४) : आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा ब्रॉन्झचा पूर्णाकृती पुतळा परभणीत लहुजी नगर येथे उभारला जाणार असून बुधवार दि.२४ जुलै रोजी पुणे येथून पुतळा परभणीकडे नेण्यासाठी रवाना करण्यात आला आहे.

             आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या स्वखर्चातून  झालेला पूर्णाकृती पुतळा पुणे येथील कला संस्कार स्टुडिओचे ख्यातनाम मूर्ती कलावंत  प्रवीण थोपटे, मंगेश कुरडकर, एल्डिन फर्नांडिस यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. पुणे येथे तयार झालेली पूर्णाकृती मूर्ती परभणीला घेऊन येण्यासाठी माजी नगरसेवक पुरभाजी साळवे, कॉ. गणपत भिसे, कॉ. अशोक उबाळे, कॉ. अविनाश मोरे, कॉ. प्रकाश बनपट्टे, कॉ. विकास गोरे, कॉ.आकाश बनपट्टे हे परभणीहून पुण्याला रवाना झाले. आज बुधवारी पुण्यातून क्रांतिवीर लहुजी साळवे यांची पूर्णाकृती मूर्ती घेऊन निघाले आहेत. उद्या गुरूवार दि.२५ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता परभणी शहरातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ सर्व जनतेने क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या मूर्तीचे स्वागत करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या