🌟पुण्याचे शैक्षणिक स्मारक : काशीबाई उर्फ बाहूलीचा हौद : युवराज शहा


🌟त्या काळात सार्वजनिक पाणी पुरवठा हा शहरात ठिकठिकाणी बांधलेल्या हौदांमार्फतच केला जात असे🌟

पूण्याच्या  डेक्कन जिमखाना परिसरातील फर्ग्यूसन रस्त्याला जोडरस्ता “डॅा.घोले“ रस्त्यावरून आपण हजारदा जात येत असतो , पण कोण होते हे डॅा घोले ? अस काय कर्तृत्व असेल या माणसाच  की  शहरातील एखाद्या महत्त्वाच्या रस्त्याला त्यांचे नाव दिले जावे ? अर्थात हा प्रश्न आपणाला कधी पडत नसतो , पण महात्मा फूले वाचताना हे डॅा विश्राम  घोले हे प्रसिद्ध शल्यविशारद आणि  फूल्यांचे  खंदे समर्थक आणि सहकारी होते , तसेच ते त्यांच्या परिवाराचे डॅाक्टर होते ,एवढीच माहीती आपणाला असते .. सावीत्रीबाई फूल्यांबाबत वाचत असताना आपली एकूलती एक कन्या बाहूलीच्या स्मरणार्थ या डॅा  घोल्यांनी बूधवारपेठेत एक हौद बांधून दिला व तो सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खूला केला इतपर्यंतचा  इतिहास ही आपणाला ज्ञात असतो , पण ह्या इतिहासा मागील कारूण्य समजले तर अंगावर अक्षरशा शहारे येतील ,  

      त्या काळात सार्वजनिक पाणी पुरवठा हा शहरात ठिकठिकाणी बांधलेल्या हौदांमार्फतच केला जात असे ,  तत्कालीन सनातनी लोक अन्य जातीच्या लोकांना या हौदांवर पाणीही भरू देण्यास विरोध करत असत  ,  त्यामूळेच  फरासखान्याजवळ फूल्यांच्नी सूरू केलेल्या मूलींच्या शाळेजवळच  डॅा घोल्यांनी  हा  “बाहूलीचा हौद  बांधण्यामागे ही एक वेगळे  कारूण्यपूर्ण औचित्य होते , कारण याच फूल्यांच्या शाळेत ही बाहूली उर्फ काशीबाई ही शिकत होती , दूर्दैवाने तिचे हे शाळेत जाणे हेच तिच्या मृत्यूचे कारण ठरले होते , डॅा घोले हे  फूल्यांच्या  सूधारणावादी चळवळीतील बिनीचे शिलेदार,आणि त्यावेळच्या  नगरपालिकेचे फूल्यांबरोबरच सदस्य  होते  आणि  तत्कालीन स्थायीसमितीचे काही काळ अध्यक्षही होते ,  स्वःताच डॅाक्टर आणि सुधारक असल्याने त्यावेळेस स्वसमाजाचा तीव्र विरोध पत्करूनही  त्यांनी आपल्या लाडक्या काशी उर्फ बाहूलीला  फूल्यांच्या शाळेत टाकले होते , आणि हीच बाब त्या अवघ्या सात आठ वर्षांच्या छोटूकलीच्या मृत्यूस पूढे कारणीभूत ठरली, मुलींना शाळेत टाकणे ही गोष्टच मूळात त्याकाळात अत्यंत समाजविरोधी व क्रांतीकारी मानली जात होती 

अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत.बाहुलीच्या शिकण्याला डॉ. घोले यांचे पाठबळ असले तरी घरातील जेष्ठ व्यक्ती, महिलांना त्यांची ही कृती पूर्ण नापसंत होती, किंबहुना प्रखर विरोध होता.अनेकदा डॉ.घोले यांना समजविण्याचा प्रयत्न स्वजातीतील अन्य मान्यवरांनी वेळोवेळी केला होता .जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी ही दिली होती , पण डॅा घोले कशाला ही बधले नाहीत महात्मा फूले यांच्या वैचारीक प्रभावामूळे  डॉ.घोले यांनी कुठल्याही  विरोधाला भीक घातली नाही.शेवटी समाजातील काही मागास विचारांच्या नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तींनी टोकाच्या द्वेषभावनेतून काचा कुटुन घातलेला लाडू  त्या अवघे सहा सात वर्ष वय असलेल्या बाहुलीस खावयास दिला. आणि ते अश्राप पोर तो काचांचा लाडू खाल्ल्या मुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन अखेर मृत्यूमुखी पडली. आज शहरभर स्कूटरवरूंन शाळाकॅालेजात मूक्तपणे जात असलेल्या किती मुलींना हे माहीत असेल की या काशीबाई उर्फ बाहूलीने त्यांच्या आजच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्या प्राणाची आहूती दिली ? 

  स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी असावा , शेवटी आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ डॉ. घोल्यानी बूधवारपेठेत "बाहुलीचा हौद " बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी झाल्याची १८८० मधील नोंद आहे.१३ सप्टेंबर १८६९ रोजी ( भाद्रपद शूद्ध ८ शके १७९१ रोजी बाहूलीचा जन्म झाला ,आणि  २७ सप्टेंबर १८७७ रोजी  ( भाद्रपद वद्य ५ , १७९९ ) तीचा केविलवाणा मृत्यू झाला , १८८० मध्ये या हौदाचे लोकार्पण करण्यात आले , आज फरासखाना पोलीसस्टेशनाच्या आवारात अनेक महीला पोलीस अधिकारी मोठ्या रूबाबात इकडून तिकडे फिरताना दिसत असतात , पण आजचा हा रूबाब  जीच्या हौतात्म्यामूळे प्राप्त झाला त्या बाहूली उर्फ काशीबाईच्या त्याच आवारातील अगदी नजरेच्या सहज टप्प्यातील  हौदाची दुरावस्था दिसत नाही हे मात्र कटू वास्तव आहे , पलीकडे गणपतींचे “श्रीमंत “मंदीर आहे , तो गणपती खरच नवसाला पावतो की नाही हे माहीत नाही , पण हजारो स्रीयांना शिक्षणाची दारे उघडून  त्यांचे आयूष्य उजळून टाकण्यासाठी आणि प्राणाची आहूती दिलेल्या या काशीबाईचे हे स्मारक अगदी त्या मंदीराला लागूनच आहे , मात्र या चिरंतन स्मारकाची आजची अवस्था एखाद्या घाणेरड्या कचराडेपो सारखी झाली आहे हे आपण तिथे जावून प्रत्यक्षात  पाहू शकता ..

  काळ बदललाय आणि कालपटावरील आठवणी आज धुसर झाल्या आहेत पण  डॉ. विश्राम घोले यांच्या नावाचा घोले रोड नेमका आज शाळा कॅालेजांच्या परिसरातच आहे , त्या रस्त्यावरून आज हजारो मूली अभिमानाने शाळा कॅालेजात जात असतात , या मूलींच्या शिक्षणासाठी आपल्या पोटच्या पोरीचा डॅा विश्राम रामजी घोले यांनी बळी दिला असला तरी ते बलिदान व्यर्थ गेले असे आता म्हणता येणार नाही आणि म्हणूनच डॅा विश्राम घोल्यांचे नाव या शैक्षणिक परिसरातील रस्त्याला देवून योगायोगाने एक अत्यंत यथार्थ व औचित्य साधले गेले आहे ,मात्र फरासखाना पोलीस चौकीच्या एका कोपऱ्यात मोडकळीस आलेला त्यांच्या मूलीच्या म्हणजेच बाहुली उर्फ काशीबाईचा स्मरणासाठी बांधिलेला  हौद आजही इतिहासाचा मुक साक्षीदार बनून स्थितप्रज्ञाची वस्त्रे लेवून अत्यंत विषन्न अवस्थेत उभा आहे. स्थावरात्मक घडामोडींमध्ये आज ना उद्या ही ऐतिहासिक हौद पाडलाही जावू शकतो , पूण्यासारख्या शैक्षणिक शहरात स्री शिक्षणाच्या या ज्ञात हौतात्म्याची ही ऐतिहासिक समाधी आम्ही जर जतन केली नाही तर आपल्या सारखे करंटे आपणच ठरू … 

 - युवराज शहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या